आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • An Inquiry Into The Voter Card Case Will Be Conducted By An IAS Officer In Karnataka

निवडणूक आयोगाने दिला आदेश:कर्नाटकात आयएएस अधिकाऱ्यामार्फत होणार मतदार कार्ड प्रकरणाची चौकशी

बंगळुरू18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकमध्ये खासगी संस्थेला दिलेल्या मतदारांची माहिती संकलित करण्याच्या कामात घोटाळा झाल्याची तक्रार काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. या आरोपाची दखल घेत निवडणूक आयोगाने वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चौकशीचे आदेश दिले आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीणा म्हणाल्या, बंगळुरूच्या विभागीय आयुक्तांना चौकशी करण्यास सांगितले आहे.

प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन सविस्तर चौकशी केली जाणार आहे. कन्नड भाषिक प्रतिवाणी या वृत्तपत्रानुसार भाजपचे माजी आमदार एनएस नंदीश रेड्डी यांनी मतदारांचा डेटा बेकायदा मिळवण्यासाठी १७.५ लाख रुपये देऊ केले होते.ही रक्कम २०१८ मध्ये बंगळुरूच्या केआर पुरम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतेवेळी चिलूम ट्रस्टला देण्यात आली होती. सोबतच ५० हजार रुपये चिलूम ग्रुपला देण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...