आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदार्पणाची संधी:चार्टर्ड अकाउंटंट प्रज्ञाला स्पर्धेत पदार्पणाची संधी

अली असगर देवजानी | अहमदाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघाकडून काॅमनवेल्थ गेम्सच्या ट्रायथलाॅन इव्हेंटमध्ये पहिल्यांदाच एक खेळाडू सहभागी झाला आहे. ही संधी अहमदाबादच्या व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट प्रज्ञा माेहन यांनी मिळवली आहे. त्यामुळे या २७ वर्षीय खेळाडूला काॅमनवेल्थ गेम्समध्ये दमदार पदार्पण करण्याची संधी आहे. ती ट्रायथलाॅनच्या स्प्रिंट प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. यामध्ये तिला ७५० मीटर स्विमिंग, २० किमी सायकलिंग आणि ५ किमी रनिंगमध्ये आपले काैशल्य पणास लावावे लागणार आहे. तिने ९ महिन्यांपूर्वी नॅशनल चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला हाेता. यातून तिला आपल्या क्रमवारीत माेठी प्रगती साधता आली. यामुळे तिची काॅमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय संघात निवड झाली. तिने एप्रिलमध्ये नेपाळमध्ये आयाेजित दक्षिण आशियाई ट्रायथलाॅनमध्ये किताब पटकावला हाेता. तसेच तिने २०१९ मध्ये विश्वचषकातही सहभाग नोंदवला हाेता.

आतापर्यंत लक्षवेधी कामगिरी :
प्रज्ञाने फक्त फिटनेससाठी ट्रायथलाॅनची सुरुवात केली हाेती. मात्र, यातील दर्जेदार कामगिरीतून तिला यामध्ये आपली वेगळी आेळख निर्माण करता आली. यादरम्यान तिला जलतरणाचा अनुभव हाेता. याचा तिला माेठा फायदा झाला.

बातम्या आणखी आहेत...