आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीची लाट सुरू:आता कडाक्याची थंडी; पण... 2022 चा डिसेंबर महिना 122 वर्षांत राह‍िला सर्वात कमी थंड

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डिसेंबर महिन्यामध्ये देशाचे सरासरी तापमान होते २१.९ अंश सेल्सियस

२०२२ चा डिसेंबर १२२ वर्षांत सर्वात कमी थंडी असलेला महिना ठरला. डिसेंबरमध्ये देशाचे सरासरी तापमान (किमान) २१.४९ अंश सेल्सियस इतके होते. ते १९०१ नंतर सर्वाधिक आहे. ते सरासरी तापमानापेक्षा एक अंश जास्त आहे. यापूर्वी २००८ मध्ये सरासरी तापमान २१.४६ अंश होते. तथापि, दिवसा व रात्रीचे तापमान इतिहासात दुसरे सर्वात उष्ण म्हणून नोंदवले गेले. डिसेंबरमध्ये सरासरी किमान तापमान १५.६५ अंश राहिले. ते डिसेंबर २००८ नंतर दुसरे सर्वाधिक होते. २००८ मध्ये सरासरी किमान तापमान १५.६९ अंश होते. अशाच प्रकारे डिसेंबर २०२२ चे सरासरी कमाल तापमान २७.३२ अंश नोंदवले. यापेक्षा अधिक तापमान केवळ एकदा २०१६ मध्ये २७.७५ अंश नोंदवले होते. कमी थंडीचा परिणाम म्हणून १५ डिसेंबरपर्यंत एकही थंडीची लाट, थंड दिवस आणि दाट धुक्याचा दिवस नव्हता. असेही यापूर्वी कधीच झाले नाही. उत्तर पश्चिमेकडील राज्य पंजाब, हरियाणा, दिल्ली व राजस्थानात १८ डिसेंबरच्या रात्रीपासून थंडीची लाट सुरू झाली. पहिला कोल्ड डे २१ डिसेंबरला राहिला. २५ ते २७ डिसेंबरदरम्यान तीव्रता वाढली, पण त्यानंतर घटली. मात्र, आता जानेवारीत तापमान वेगाने खाली आले आहे. पुढील एक आठवडा उत्तर व मध्य भारतात थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे म्हटले जात आहे.

मध्य भारतात सरासरी तापमान २२.६९ अंश, सरासरीपेक्षा १.२५ अंशाने जास्त : मध्य भारत म्हणजे मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर छत्तीसगड आणि पूर्व गुजरातमध्ये सरासरी तापमान २२.६९ अंश इतके नोंदवले आहे. ते सरासरीपेक्षा १.२५ अंश सेल्सिअस अधिक आहे. मध्य भारत, पूर्व आणि इशान्येत सरलेला डिसेंबर महिना दिवसाच्या वेळी इतिहासात सर्वात उष्ण राहिला. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि सर्व इशान्येकडील राज्यांत सरासरी कमाल तापमान २५.८५ अंश नोंदवले. ते सरासरीपेक्षा १.४३ अंश जास्त आहे.

टॉप-५... सन २००० नंतरच राहिले सर्वात
कमी थंडी असलेले डिसेंबर महिने
वर्ष तापमान रँक
२०२२ २१.४९0 १
२००८ २१.४६0 २
२०१६ २१.४०0 ३
२०१५ २१.१३0 ४
२००९ २१.००0 ५

डिसेंबरमध्ये सरासरी तापमान १ अंश जास्त राहते. यामुळे पिकांपासून वनस्पतीपर्यंत सर्वांना नुकसान पोहोचते.
सरासरी कमाल तापमान

वर्ष तापमान रँक
२०१६ २७.७५0 १
२०२२ २७.३२0 २
२००८ २७.२२0 ३
१९५३ २७.१०0 ४
२००० २७.०८0 ५

सरासरी किमान तापमान
वर्ष तापमान रँक

२००८ १५.६९0 १
२०२२ १५.६५0 २
१९६७ १५.५३0 ३
१९७९ १५.३२0 ४
१९५८ १५.२२0 ५

बातम्या आणखी आहेत...