आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Analysis | This Year Gold Will Be 65 Thousand Or 57 Thousand... It Will Depend On Recession inflation And War

दिव्य मराठी विश्लेषण:यंदा सोने 65 हजारी की 57 हजारी?, हे मंदी-महागाई अन् युद्धावरच ठरणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोने आता ६१ हजारांजवळ... चांदी ७४,५२२ वर पोहोचली, २७ दिवसांत सोने दर ५,३०८ रु., चांदीत १२,७३१ रु.वाढ

सोन्याच्या सुवर्ण सफारीने बुधवारी नवा विक्रम रचला. २४ कॅरेट सोने प्रथमच ६०,७८१ रु./ १० ग्रॅम वर बंद झाले. चांदीही ३१ महिन्यानंतर ७३,८३४ रु./ प्रतिकिलोवर पोहोचली. यापूर्वी चांदीने ७ अॉगस्ट २० रोजी ७५,०१३ चा उच्चांक गाठला होता. १० मार्च ते ५ एप्रिलदरम्यान सोने ५३०८ रु. आणि चांदी १२,७३१ रु.पर्यंत वधारली आहे.

पृथ्वीराज कोठारी
राष्ट्रीय अध्यक्ष, आयबीजेए

सोने दराला या वर्षी कितपत झळाळी येईल यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतील. सोन्यातील सध्याच्या तेजीमागे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरील खटला हे आहे. पण हे एकमात्र कारण नाही. अमेरिकी बँका दिवाळखोर झाल्याने डॉलर निर्देशांक ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. चलन कमजोर झाल्याने केंद्रीय बँकांनी सोन्याची दहा वर्षांतील सर्वात मोठी खरेदी केली. मंदी, महागाई आणि रशिया युक्रेन युद्धात फिनलंड नाटोमध्ये सहभागी झाल्याने शेअर बाजारावर दबाव आहे. यामुळे सोन्याकडे कल वाढला आहे. तेजी राहिल्यास यंदा सोने ६५ हजारांवर जाऊ शकते. शेअर बाजार सुधारल्यास दर १० ग्रॅम ५८ हजारांपर्यंत घसरू शकेल.

शेअर बाजाराचा परतावा यंदा कमी असल्यानेही सोने तेजीत
^या वर्षात आतापर्यंत सोन्याने ११ % परतावा दिला आहे, तर चांदीने ८% आणि शेअर बाजाराने -१.८९% दिला आहे. यामुळेही सोन्याची मागणी वाढली आहे. चलन कमजोर झाल्याने केंद्रीय बँकांनी सोने खरेदी केले त्यामुळे दर वाढले. भू-राजकीय कारणांचीही भर पडली आहे. सोने सार्वकालिक उंचीवर पोहोचल्याने चांदीतही तेजी आली आहे.औद्योगिक मागणी वाढल्याचा परिणामही चांदीच्या दरावर झाला आहे. यंदा चांदीचे दर किलोमागे ९० हजार रुपयांवर जाऊ शकतात.
- अजय केडिया, संचालक, केडिया अॅडव्हायझरी

तेलाचे दर घटले... युद्ध संपल्यास सोनेही घसरेल
^सोन्यातील तेजी पाहून डोळे झाकून त्याचा पाठलाग करू नये. कारण कच्च्या तेलाचे दर घटले आणि रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात आल्यास फेडरल बँकही व्याजदरात अचानक वाढ करू शकते. मग सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ५७-५८ हजार रुपयांपर्यंत कोसळतील. महागाई वाढल्यास जुने सोने बाजारात येऊ शकते. त्याचाही परिणाम होईल. तथापि, भारतात लग्नसराई आणि अक्षय्य तृतीयेसारख्या सणांमुळे मागणी वाढल्यास त्याला आधार मिळेल.
- अनुज गुप्ता, उपाध्यक्ष (रिसर्च),आयआयएफएल.

पर्याय काय? सोने गुंतवणुकीसाठी सॉव्हेरियन बॉँड सर्वोत्तम
जाणकारांच्या मते, उत्तम परताव्यासाठी सोन्यात दीर्घकाळ गंुतवणूक करण्याची इच्छा असल्यास साॅव्हेरियन गोल्ड बाँड हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण यात २.५% अितरिक्त व्याजही मिळते. शेअर बाजारात गुंतवणुकीची इच्छा असल्यास गोल्ड ईटीएफ चांगले आहे. परंतु अर्थसंकल्पात दीर्घकाळ गंुतवणुकीवर कर लावल्याने कल दिसून येत नाही. अल्पमुदतीसाठी प्रत्यक्ष सोने खरेदी चांगली आहे.