आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anand Sharma Resigns As Himachal Pradesh Congress Working Committee President, Says No Compromise On Self respect, Second Blow To Congress After Azad

आझादांनंतर काँग्रेसला दुसरा झटका:आनंद शर्मांचा हिमाचल प्रदेश काँग्रेस संचालन समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या संचालन समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना शर्मा यांनी पत्र लिहून आत्मसन्मानाशी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे नमूद केल्याचे सांगण्यात येते. सोनिया गांधी यांनी हिमाचल प्रदेश काँग्रेस अध्यक्षाच्या नियुक्तीसह काही समित्यांची २६ एप्रिल रोजी घोषणा केली होती. त्यामध्ये एक संचालन समितीही होती. याचे अध्यक्षपद आनंद शर्मा यांना तर आशा कुमारी यांना संयोजक पदावर नियुक्त केले होते.

जम्मू-काश्मीरमध्ये विकार रसूल यांना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी प्रचार समितीतून राजीनामा दिला होता. आझाद व शर्मा काँग्रेस नेतृत्वात बदल करण्याच्या विचाराचा गट जी-२३ शी संबंधित असून हा गट पक्ष नेतृत्वाच्या निर्णयांवर टीका करतो. आनंद शर्मा यांनी १९८२ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. ते अनेकदा राज्यसभेचे सदस्य आणि पक्षात महत्त्वाच्या पदांवर राहिले आहेत.

पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने निवडणूक प्रचार करू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले की, हिमाचल काँग्रेसच्या गाभा गटाची तसेच निवडणूक धोरण आणि तयारीबाबत ज्येष्ठ नेत्यांच्या दिल्ली आणि सिमला दोन्ही ठिकाणी बैठका झाल्या. मात्र, त्यांनी याबाबत माहिती दिली नाही. महत्त्वाच्या बैठकांना न बोलावल्यामुळे ते नाराज होते. राज्यात विधानसभा निवडणुकीआधी आनंद शर्मा यांचा राजीनामा काँग्रेस पक्षासाठी मोठा झटका मानला जात आहे. मात्र, आनंद शर्मा यांनी पक्ष उमेदवाराच्या बाजूने प्रचार करू, असे स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...