आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धा हत्याकांडाहून भयानक मर्डर:विशाखापट्टणममध्ये ड्रममध्ये आढळले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे, 1 वर्षापासून बंद होते घर

हैदराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आफताब अमीन पूनावालने आपली लिव्ह इन पार्टनर श्रद्धाची हत्या करून तिचे 35 तुकडे केले. या घटनेमुळे अवघे समाजमन सुन्न झाले. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना उजेडात आल्या. ताजी घटना आंध्र प्रदेशाच्या विशाखापट्टणममध्ये घडली आहे. तेथील एका बंद घरातील ड्रममध्ये महिलेचे अनेक तुकडे आढळलेत. या तुकड्यांची स्थिती पाहता पोलिसांनी हा मृतदेह या ठिकाणी मागील वर्षभरापासून पडून असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.

दरवाजा तोडल्यानंतर घटना उजेडात

NDTVच्या वृत्तानुसार, भाडेकरून मागील वर्षभरापासून भाडे न दिल्यामुळे घर मालकाने घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर घरातील एका ड्रममध्ये महिलेच्या शरीराचे अवयव आढळले. विशाखापट्टणम शहराचे पोलिस आयुक्त श्रीकांत यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, घर मालकाने घर रिकामे करण्यासाठी कुलूप तोडल्यानंतर ही घटना उजेडात आली. गतवर्षी जून महिन्यात पत्नी गरोदर असल्याचे सांगून भाडेकरून भाडे न देता घर खाली केले होते, असे ते म्हणाले.

भाडेकरू वर्षभरापासून गायब

पोलिस आयुक्तांनी सांगितले की, हा भाडेकरू एकदा घराच्या मागच्या दाराने घरी आला होता. पण तेव्हाही त्याने मालकाला भाडे दिले नव्हते. परिणामी वर्षभराहून अधिक काळ वाट पाहिल्यानंतर घर मालकाने भाडेकरूचे सामान बाहेर काढण्यासाठी घराचे कुलूप तोडले असता त्यांना ड्रममध्ये महिलेच्या शरीराचे तुकडे आढळले.

पोलिसांनी या महिलेची वर्षभरापूर्वी हत्या करून तुकडे केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा मृतदेह या घरात राहणाऱ्या भाडेकरूच्या पत्नीचा असल्याचाही दावा आयुक्तांनी केला आहे. ते म्हणाले - या प्रकरणी घरमालकाने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला पकडण्यासाठी शोध मोहिमही सुरू केली आहे.

काय आहे श्रद्धा हत्याकांड

आफताब व श्रद्धा.
आफताब व श्रद्धा.

आफताब पूनावालाने 18 मे रोजी 27 वर्षीय श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून ते दक्षिण दिल्लीच्या महरौली स्थित आपल्या घरातील फ्रिजमध्ये ठेवले. हे तुकडे तो अनेक दिवसांपर्यंत मध्यरात्रीनंतर शहराच्या विविध भागांत जाऊन फेकत होता.

बातम्या आणखी आहेत...