आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Andhra Pradesh Temple | Andhra Pradesh Govt Build 3,000 Temples Protect Hindu Faith | Ys Jagan Mohan Reddy

आंध्र प्रदेशात 3000 मंदिरे करणार हिंदू धर्माचे रक्षण:जगन सरकारचा निर्णय - प्रत्येक गावात असावे मंदीर, तिरुपती देवस्थान प्रत्येक मंदिराला 10 लाख देणार

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्र प्रदेशात सुमारे 3000 मंदिरे बांधली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी मंगळवारी ही माहिती दिली. हिंदू धर्माचे रक्षण आणि प्रचार करण्यासाठी दुर्बल घटकांच्या भागात हिंदू मंदिरांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात मंदिर बांधले जाईल, असे ते म्हणाले.

यादीत 1400 नवीन मंदिरे जोडली
तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या श्री वाणी ट्रस्टने मंदिर उभारणीसाठी प्रत्येक मंदिराला 10 लाख रुपये दिले आहेत. 1330 मंदिरांचे बांधकाम सुरू झाले. आता या यादीत आणखी 1465 मंदिरांचा समावेश झाला आहे. काही आमदारांच्या विनंतीवरून आणखी 200 मंदिरांचा यात समावेश करण्यात आला आहे. वृत्तानुसार, बंदोबस्ती विभागांतर्गत 978 मंदिरांचे बांधकाम वेगाने सुरू आहे, तर एका सहाय्यक अभियंत्याकडे 25 मंदिरांचे काम सोपवण्यात आले आहे.

धूप-दीप नैवैद्यमसाठीही निधी जारी

हनुमान मंदिराच्या प्रकल्पाची माहिती समजून घेताना जगन मोहन रेड्डी.
हनुमान मंदिराच्या प्रकल्पाची माहिती समजून घेताना जगन मोहन रेड्डी.

काही मंदिरांना वाटप करण्यात आलेल्या 270 कोटी रुपयांच्या सीजी निधीपैकी 238 कोटी रुपये त्यांच्या नूतनीकरणासाठी आणि धार्मिक विधींसाठी जारी करण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्षात प्रति मंदिर 5000 रुपये दराने धार्मिक विधींसाठी राखून ठेवलेल्या 28 कोटींपैकी 15 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

उपमुख्यमंत्री सत्यनारायण म्हणाले की, 2019 पर्यंत धुपदीप योजनेअंतर्गत केवळ 1561 मंदिरांची नोंदणी झाली होती, जी आता 5,000 झाली आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या श्री वाणी ट्रस्टने मंदिरांच्या बांधकामासाठी प्रत्येक मंदिराला 10 लाख रुपये दिले आहेत.
तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या श्री वाणी ट्रस्टने मंदिरांच्या बांधकामासाठी प्रत्येक मंदिराला 10 लाख रुपये दिले आहेत.

आंध्र प्रदेश – 5,000 मंदिरांसाठी 5,000 रु. दर महिन्याला
जगन मोहन सरकारने यापूर्वीच 26 जिल्ह्यांमध्ये 1400 मंदिरे बांधण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी 1030 बांधकामे सरकार स्वत: तर 330 समरसथ सेवा फाऊंडेशन बांधत आहेत. विशेष म्हणजे हे फाउंडेशन आरएसएसशी संलग्न एनजीओ आहे. प्रत्येक मंदिरासाठी 8-8 लाख आणि मूर्तीसाठी 2-2 लाख रुपयेची तरतूद आहे

आंध्र प्रदेश सरकारचे सल्लागार देउलापल्ली अमर म्हणाले की, जगन सरकार भेदभाव न करता काम करत आहे. चंद्राबाबू नायडूंच्या काळात विकासाच्या नावाखाली पाडलेली 40 मंदिरे बांधली जात आहेत. नवीन मंदिरेही बांधली जात आहेत.

धूप दीप नैवेद्यम योजनेअंतर्गत 5000 मंदिरांसाठी 5 हजार रुपये दिले दरमहा जात आहेत. इमामांसाठी 10,000, श्रेणी-1 मंदिरांच्या पुजाऱ्यांसाठी 15,625 आणि श्रेणी-2 पुजाऱ्यांसाठी 10,000 रुपये असे मासिक मानधन दिले जाते. पुजाऱ्यांनाही 5 हजार मिळतात.

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आंध्र प्रदेशच्या जगन मोहन सरकारने राज्यात 3,000 हिंदू मंदिरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आंध्र प्रदेशच्या जगन मोहन सरकारने राज्यात 3,000 हिंदू मंदिरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

यादीच्या शीर्षस्थानी या मंदिरांची नावे

  • सीएम बसवराज बोम्मई यांनी रामदेवरा बेट्टा येथे राम मंदिर बांधण्याची घोषणा केली. हे ठिकाण दक्षिणेची अयोध्या म्हणून विकसित करण्याचा दावा केला जात आहे.
  • कोप्पल जिल्ह्यात अंजनाद्रीच्या टेकडीचाही विकास केला जाणार आहे. हे हनुमानजींचे जन्मस्थान मानले जाते.
  • कोंडागट्टू जिल्ह्यातील अंजनेय स्वामी मंदिरासाठी 500 कोटी देण्याची घोषणा केली, 100 कोटी आधीच दिले होते.
  • यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यातील प्राचीन यादगिरीगुट्टा लक्ष्मी नरसिंह मंदिराची पुनर्बांधणी 1800 कोटी रुपये खर्चून केली आहे.
  • करीमनगर येथील राज राजेश्वर शिवमंदिराच्या पुनर्बांधणीचीही योजना आखण्यात आली आहे.

आंध्र CM ची बहीण बसलेली गाडी चक्क पोलिसांनी क्रेनने ओढली

हैदराबाद पोलिसांनी YSRTP प्रमुख शर्मिला रेड्डी यांच्या कारला क्रेनने ओढले. यावेळी शर्मिला या कारमध्ये बसलेल्या होत्या. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. शर्मिला या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहीण आहेत. तेलंगणातील लोकांसाठी राजकीय पर्याय म्हणून त्यांनी 2021 मध्ये YSRTP पक्षाची स्थापना केली होती. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...