आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Andhra Pradesh Engineering College Hostel Video; Student Burnt With Iron Box, Latest News And Update  

होस्टेलमधील विद्यार्थ्यास इस्त्रीने चटके दिले VIDEO:आधी खोलीत बंद करून काठीने मारहाण केली; व्हिडिओ व्हायरल, आरोपी अटक

विजयवाडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
ही घटना 3 नोव्हेंबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी यातील आरोपींना अटक केली.

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एसआरकेआर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मारहाणाची घटना घडली आहे. होस्टेलमधील काही विद्यार्थ्यांनी आपल्या एका सहकाऱ्यास आधी एका खोलीत कोंडले त्यास काठीने मारहाण केली. तर त्यास इस्त्रीचे चटके दिले. या अमानुष मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेतील आरोपींवर कारवाई केली आहे.

सदर फोटो हा पीडित विद्यार्थ्याचा आहे. त्याच्या पाठीवर इस्त्रीच्या चटके दिल्याचा खूणा दिसत आहेत.
सदर फोटो हा पीडित विद्यार्थ्याचा आहे. त्याच्या पाठीवर इस्त्रीच्या चटके दिल्याचा खूणा दिसत आहेत.

विजयवाडा पोलिसांनी सांगितले की, मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव अंकीत आहे. हल्लेखोर त्याच्याच वर्गातील सहकारी आहेत. सर्व विद्यार्थी एसआरकेआर कॉलेजच्या कॉम्प्युटर सायन्स विभागात शिक्षण घेतात. दरम्यान, अंकितला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बाहेरून 4 जण आली, अंकित विनवणी करित होता

कॉलेज व्यवस्थापनाने पोलिसांना सांगितले की, मारहाण करणारे चार मुले खासगी वसतिगृहात राहतात. घटना दोन दिवसांपूर्वीच आहे. मारहाणीदरम्यान अंकित त्या मुलांची माफी मागताना दिसला. त्यांना येथून जाण्याची अंकित विनवणी करित होता. मात्र, ते अंकितचे काही एक ऐकत नव्हते. अखेर त्यास बेदम मारहाण करून अंकितला गरम इस्त्रीचे चटके दिले.

मारहाणीदरम्यान अंकित वारंवार आरोपींना निघून जाण्याची विनंती करत होता. मात्र, त्याला काठीने माराहण केली जात होती.
मारहाणीदरम्यान अंकित वारंवार आरोपींना निघून जाण्याची विनंती करत होता. मात्र, त्याला काठीने माराहण केली जात होती.

आरोपीस अटक, कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मिळालेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी चौकशी करण्यात येत आहे. मात्र अद्यापपर्यंत मारहाणीचे कारण समोर आलेले नाही. पोलिसांच्या कारवाईनंतर देखील आम्ही संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करू असे, आश्वासन महाविद्यालयातील प्रशासनाने दिली.

बातम्या आणखी आहेत...