आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Andhra Pradesh Female Dentist Murde, Engineer Boyfriend Killed Girlfriend | Guntur News

आंध्र प्रदेशात डेंटल गर्लफ्रेंडची हत्या:प्रियकराने सर्जिकल चाकूने कापला गळा; तरुणीने दुर्लक्ष केल्यामुळे नाराज होता तरुण

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोघांची 2 वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते.  - Divya Marathi
दोघांची 2 वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 

आंध्र प्रदेशाच्या गुंटूर जिल्ह्यातील एका सॉफ्टवेयर इंजिनियरने आपल्या प्रेयसीची हत्या केली. आरोपीने सर्जिकल चाकूच्या मदतीने तरुणीचे कळा कापला. त्यानंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी प्रसंगावधान राखून त्याला धरले. प्रेयसीने आपल्याकडे कानाडोळा केल्यामुळे तिला ठार केल्याचा दावा आरोपीने केला आहे.

तपस्वी (20) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती दंतवैद्यक शास्त्राची विद्यार्थिनी होती. ती 2 वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून 24 वर्षीय आरोपी गणेश्वरच्या संपर्कात आली होती. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. पण काही महिन्यांपासून त्यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर आरोपीने तरुणीशी संवाद साधला होता. पण तरुणीने त्याला बोलण्यास नकार दिला.

आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार

काही महिन्यांपूर्वी मुलीने गणेश्वर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तरुणीला त्रास न देण्यासाठी तरुणाची काउंसलिंग करण्यात आली. तपस्वी मागील आठवड्याभरापासून गुटूंरलगत तक्केल्लापडूमधील आपल्या मैत्रिणीसोबत राहत होती. तरुणीचा पत्ता मिळाल्यानंतर गणेश्वर सोमवारी तिथे गेला. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान दोघांत वाद झाला. त्यामुळे संतापाच्या भरात मुलाने सर्जिकल चाकू काढला आणि थेट तिचा गळा कापला. हे पाहून तपस्वीची मैत्रीण शेजाऱ्यांना बोलावण्यासाठी धावली. तोपर्यंत गणेश्वरने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तपस्वीला ओढत शेजारच्या खोलीत नेले व शेजारी येईपर्यंत खोलीचा दरवाजा आतून बंद केला.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला

शेजाऱ्यांनी दरवाजा उघडताच गणेश्वरने स्वतःच्या हाताच्या नसा कापण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी त्याला धरले व पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर मुलीला गुंटूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...