आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Andhra Pradesh Konaseema District Renaming Controversy Updates । 20 Policemen Injured In Violence, Transport Minister's House Burnt

आंध्र प्रदेशात नामांतराचा वाद:अमलापुरम शहरात जमावाने परिवहन मंत्री आणि आमदारांचे घर जाळले; दगडफेकीत 20 पोलीस जखमी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्याच्या नामांतराच्या निषेधार्थ अमलापुरममध्ये मंगळवारी हिंसाचार झाला. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करून वाहने पेटवून दिली. अमलापुरम शहरात जमावाने परिवहन मंत्री पी. विश्वरूपा आणि मुम्मीदिवरमचे आमदार पी. सतीश यांची घरेही जाळली.

पोलिसांनी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवले. संतप्त जमावाने पोलिसांचे वाहन आणि बसही जाळली. दगडफेकीत सुमारे 20 पोलीस जखमी झाले.

संतप्त जमावाने परिवहन मंत्री पी. विश्वरूपा यांच्या घराला आग लावली.
संतप्त जमावाने परिवहन मंत्री पी. विश्वरूपा यांच्या घराला आग लावली.

काय आहे प्रकरण

खरं तर 4 एप्रिल रोजी आंध्र प्रदेश सरकारने पूर्व गोदावरी जिल्ह्यातून कोनसीमा जिल्हा काढला. अलीकडेच या जिल्ह्याचे नाव बदलून बीआर आंबेडकर कोनसीमा करण्यात आले. सरकारने नाव बदलाबाबत लोकांकडून हरकतीही मागवल्या होत्या. यानंतर कोनसीमा साधना समितीने नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आक्षेप घेत जिल्ह्याचे नाव कोनसीमा असेच ठेवण्याची मागणी केली.

आंदोलकांनी पोलिस व्हॅन आणि बसचीही जाळपोळ केली.
आंदोलकांनी पोलिस व्हॅन आणि बसचीही जाळपोळ केली.

ही समिती मंगळवारी डीएम हिमांशू शुक्ला यांना निवेदन देणार होती. त्यानंतर प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाभोवती कलम 144 लागू केले. मात्र, समितीचे शेकडो लोक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. समितीने अमलापुरम शहरातील मुम्मीदिवरम गेट, घंटाघर आणि इतर ठिकाणी निदर्शने केली. यानंतर पोलिसांनी यावर कारवाई केली.

संतप्त जमावाने मुम्मदीवरमचे आमदार पी. सतीश यांच्या घरालाही आग लावली.
संतप्त जमावाने मुम्मदीवरमचे आमदार पी. सतीश यांच्या घरालाही आग लावली.

निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी काही आंदोलकांना अटकही केली. यावेळी काही तरुण पळून गेले, पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही लाठीचार्ज केला. त्यानंतर हिंसाचार उसळला.

आंदोलकांच्या अटकेनंतर प्रकरण चिघळले, त्यानंतर जाळपोळ सुरू झाली.
आंदोलकांच्या अटकेनंतर प्रकरण चिघळले, त्यानंतर जाळपोळ सुरू झाली.

गृहमंत्री म्हणाले- दोषींना सोडणार नाही

राज्याच्या गृहमंत्री तनेती वनिता यांनी राजकीय पक्षांवर जिल्ह्यातील हिंसाचाराचा आरोप केला आहे. काही राजकीय पक्ष आणि असामाजिक तत्त्वांनी मिळून हिंसाचार घडवून आणल्याचे ते म्हणाले. या घटनेत सुमारे 20 पोलीस कर्मचारी जखमी होणे दुर्दैवी आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू आणि जो कोणी दोषी असेल, त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या वादानंतर जमावाने दगडफेकही केली.
पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या वादानंतर जमावाने दगडफेकही केली.

जगन मोहन रेड्डी यांनी 13 नवीन जिल्हे निर्मितीचे आश्वासन दिले होते

जगन मोहन रेड्डी सरकारने 2019च्या विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात नवीन जिल्हे निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. 2 एप्रिलच्या रात्री राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आणि 13 नवीन राज्यांच्या स्थापनेची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर 4 एप्रिल रोजी ही राज्ये अस्तित्वात आली. आता राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या 13 वरून 26 झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...