आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Andhra Pradesh Latest News Update | Andhra Pradesh Police, COVID 19 Outbreak, Coronavirus Cases

कोरोनाची अशीही भीती:आंध्र प्रदेशात एका कुटुंबात कोरोनामुळे झाला होता मृत्यू; मृत्यूच्या भीतीने शेजारील कुटुंबाने स्वत:ला 15 महिने घरातच ठेवले कोंडून

पूर्व गोदावरी3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कैदेत असलेल्या लोकांची सुटका करण्यात आली असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी भागातील कडाळी गावात एक वेगळेच प्रकार समोर आले आहे. या गावातील एका कुटुंबाने स्वतःला कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूच्या भीतीने चक्क मागील 15 महिन्यांपासून घरात कोंडून ठेवले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी तेथील लोकांची सुटका केली.

कडाली येथील संरपच चोप्पला गुरुनाथ यांच्या माहितीनुसार, गावातील एका व्यक्तींचा कोरोनामूळे मृत्यू झाला होता. त्यांच्या शेजारील कुटुंबाने मृत्यूच्या भीतीने चक्क 15 महिने स्वतःला घरात कोंडून ठेवले. रुथम्मा (50), कांतामणी (32) आणि राणी (30) अशी त्यांची नावे आहेत.

संरपचानी दिली पोलिसांना माहिती
मागील पंधरा महिन्यापासून घरात कैद असल्याने या लोकांची प्रकृती खराब झाली होती. त्यांनी ना अंघोळ केली होती ना ही दाढी कटींग. सरपंचानी ही बाब पोलिसांच्या निर्दशनास आणून दिली. त्यानंतर कैदेत असलेल्या लोकांची सुटका करण्यात आली असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...