आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Andhra Pradesh Man Burnt Alive In Car; Brother Love Affair Case | Hyderabad News

आंध्र प्रदेशात कारमध्ये पुरुषाला जिवंत जाळले:लहान भावाचे विवाहितेशी अफेअर, महिलेच्या कुटुंबींयाना मोठ्या भावावर उगवला सूड

हैदराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे काही जणांनी मिळून एका व्यक्तीला कारमध्ये जिवंत जाळले. मृताच्या धाकट्या भावाचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते, याचा बदला म्हणून त्याच्या मोठ्या भावाला जाळण्यात आले. भावाबद्दल बोलण्यासाठी महिलेच्या कुटुंबीयांनी त्याला गाडीत बसवून पेटवून दिले. याआधी त्यांनी त्याला मारहाणही केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अशी आहे संपूर्ण घटना...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागराजू असे मृताचे नाव आहे. तो आणि त्याचा धाकटा भाऊ पुरुषोत्तम कोनसीमा जिल्ह्यातील रामचंद्रपुरमचे रहिवासी होते. येथूनच पुरुषोत्तमचे रिपुंजया या महिलेशी प्रेमसंबंध सुरू झाले.

महिलेच्या कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी नागराजू यांना प्रकरण मिटवण्यासाठी बोलावले. नागराजू यांना त्यांच्या गाडीत बसवून ते अज्ञात स्थळी गेले. दरम्यान, नागराजू यांना बेदम मारहाण करून त्यांचे हातपाय बांधण्यात आले.

यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी कारवर पेट्रोल शिंपडून आग लावली. वृत्तानुसार, त्या लोकांनी कार खड्ड्यात टाकण्याचाही प्रयत्न केला, मात्र कारच्या चाकासमोर मोठा दगड आल्यामुळे कार खड्ड्यात पडली नाही.

महिलेच्या कुटुंबीयांनी कारवर पेट्रोल शिंपडून आग लावली. त्यात नागराजूचा जळून मृत्यू झाला.
महिलेच्या कुटुंबीयांनी कारवर पेट्रोल शिंपडून आग लावली. त्यात नागराजूचा जळून मृत्यू झाला.

एका आरोपीवर गुन्हा दाखल, अटक नाही

नागराजू गाडीत जळत असल्याचे पाहून तेथून जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. या लोकांनी नागराजूला वाचवण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

गुन्ह्यांशी संबंधित याही बातम्या वाचा...

वकिलाची हत्या, LIVE VIDEO:वकिल पळत होते, मारेकरी मागे लागले; पोट अन् छातीवर चाकूने वार त्यानंतर दगडाने डोके ठेचले

जोधपूरमधील 55 वर्षीय वकील जुगराज चौहान हत्या प्रकरणात रविवारी आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये वकील जीव वाचविण्यासाठी पळत होते तर मारेकरी त्यांचे चुलत भाऊ त्यांच्यामागे धावताना दिसत आहे. खाली पाडून छाती आणि पोटावर चाकूने सतत वार करत आहे. त्यानंतर दगडाने त्याचे डोके ठेचतात. यावरून वकिलाच्या हत्येचा कट समोर आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

प्लास्टिक बॅगमध्ये सापडले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे:मुलीने अनेक महिने कोंडून ठेवले, नंतर खून केला : पोलिसांना संशय

मुंबईतील लालबाग परिसरातील अपार्टमेंटमध्ये एका 53 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत आढळला आहे. महिलेचा भाऊ आणि पुतण्याने काही दिवसांपूर्वी काळाचौकी पोलीस ठाण्यात महिला हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिस शोधासाठी महिलेच्या घरी पोहोचले. दरम्यान, त्यांना एका प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे हात, पाय काही भाग कापलेले होते. येथे वाचा संपूर्ण बातमी

मैदानावर रक्तपात:नो-बॉल दिल्यामुळे अंपायरची हत्या, ओडिशातील फ्रेंडली मॅचमध्ये घडली घटना; 4 आरोपींना अटक

ओडिशाच्या कटक येथे रविवारी एका फ्रेंडली सामन्यात अंपायरची निर्घृण हत्या करण्यात आली. सामना खेळणाऱ्या खेळाडूंनी अंपायरिंग करणाऱ्या लकी राऊत नामक 22 वर्षीय तरुणाला बॅट व चाकूने भोसकून ठार मारले. लकीने एक बॉल नो बॉल घोषित केला होता. त्याला खेळाडूंनी विरोध दर्शवला. त्यानंतर वाद एवढा वाढला की, खेळाडूंनी थेट अंपायरिंग करणाऱ्या लकीवरच हल्ला चढवला. येथे वाचा संपूर्ण बातमी

यूपीत मुलीच्या अब्रूसाठी बापाने केली हत्या:प्रियकर सौरभला आधी दारू पाजली, मग फावड्याने शिर केले धडावेगळे​​​​​​​​​​​​​​

उत्तर प्रदेशात एका बापाने आपल्या मुलीच्या अब्रूसाठी तुरुंगात जाणे पसंत केले. मुलीचे लग्न महिनाभरापूर्वी निश्चित झाले होते. लवकरच तिची विदाई होणार होती. पण कुटुंबाच्या सन्मानासाठी वडिलांनी हात रक्ताने माखण्याचा निर्णय घेतला. ही घटना ग्रामीण बरेलीच्या सिरौली पोलीस स्टेशन हद्दीतील धनैरा गौरी गावातील आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी