आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापत्नीपासून सुटका मिळावी तिला घटस्फोट देता यावा, यासाठी आंध्रप्रदेशातील एका पतीने अतिशय धक्कादायक घटना घडवून आणली आहे. त्या पतीने आपल्या गर्भवती पत्नीला नियमित तपासणीला नेण्याचा बहाणा करून तिला HIV बाधित रक्त चढविले.
अर्थात या विचित्र कारनाम्यात एक झोली डॉक्टराचा देखील हात आहे. ही बाब समोर आल्यानंतर त्याच्या पत्नी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आंध्रप्रदेशातील गुंटूरमध्ये राहणाऱ्या एम. चरण अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस एम चरणची चौकशी करित आहे.
नियमित तपासणीतून आले समोर
घटस्फोट घेण्यासाठी पत्नीला एचआयव्ही बाधित रक्त देऊ केले. पत्नी गरोदर होती, ती नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली असता रक्त तपासणीतून ही बाब समोर आली. त्या महिलेने पतीविरुद्ध ताडेपल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
महिलेचा आरोप आहे की, मला पती हुंड्यासाठी कायम मारहाण करत असतो. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण त्याला मुलगा हवा होता. त्याचे विशाखापट्टणम येथील एका महिलेसोबत अवैध संबंध असल्याचा देखील आरोप त्या महिलेने केला आहे. आपल्यापासून घटस्फोट घेण्यासाठी त्याने मला एचआयव्ही बाधित रक्त चढविले. यात एका डॉक्टराचा देखील हात असल्याचा आरोप तीने केला.
काय आहे संपूर्ण प्रकरण, वाचा सविस्तर
आंध्रप्रदेशातील ताडेपल्ली येथे राहणारा 40 वर्षीय एम चरण याला पत्नीपासून घटस्फोट घ्यायचा होता. त्याने एक योजना बनवली. तो गरोदर पत्नीला एका झोल करणाऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी महिलेला सांगितले की, तिला गरोदरपणामुळे तुमच्यात रक्ताची कमी आहे. त्यासाठी रक्त चढवावे लागेल. परंतू हे रक्त एचआयव्ही बाधित होते.
काही दिवसानंतर ती महिला नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली. तेव्हा रक्ततपासणीत ती HIV पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यावेळी त्या महिलेने आपल्या पतीला विचारले की, मला एचआयव्ही झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तुम्ही नेमकं काय केले. यावर चरणने सांगितले की, अंगणवाडीत लसीकरण केल्यानंतरच तुला संसर्ग झाला असेल.
पोलिसांनी चरणला चौकशीसाठी ताब्यात घेतले
सदर गर्भवती महिलेने आरोप केल्यानंतर ताडेपल्ली पोलिसांनी चरणला अटक केली आहे. पत्नीच्या आरोपांबाबत त्याची चौकशी केली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, पीडितेने असाही आरोप केला आहे की, चरण तिच्यापासून सुटका हवी होती. त्यामुळे एचआयव्ही बाधित रक्त चढविण्याबरोबरच तो तिला विषारी औषध देखील देत होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.