आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंध्र प्रदेशात आला अज्ञात आजार:पश्चिम गोदावरी जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त लोकांना उलटी आणि चक्करसह अचानक आले झटके

विशाखापट्टनमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेगवेगळ्या परिसरातील रुग्ण, एकमेकांशी काहीच संबंध नाही

आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एलुरुमध्ये एक अज्ञात आजार पसरला आहे. वेगवेगळ्या परिसरात शनिवारी रात्रीपर्यंत याची 55 प्रकरणे समोर आली. रविवारी सकाळपर्यंत ही संख्या 170 आणि दुपारपर्यंत 200 पेक्षा जास्त झाली.

एलुरुच्या सरकारी रुग्णालयातील सुपरिटेंडेंट डॉ. मोहन यांनी सांगितले की, या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत 140 पेक्षा जास्त लोकांना भरती करण्यात आले होते. नंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. या रुग्णांमध्ये चक्कर येण्यासोबतच, डोकेदुखी आणि झटक्याची लक्षणे दिसत आहेत. याचे कारण अद्याप समजू शकले नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री अला काली कृष्णा म्हणाले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. सर्व रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. सर्व रुग्ण सुरक्षित आहेत.

वेगवेगळ्या परिसरातील रुग्ण, एकमेकांशी काहीच संबंध नाही

डॉक्टरांनी सांगितले की, सर्व रुग्णांचे रक्ताचे , खाण्याचे आणि पाण्याचे सँपल फोरेंसिक तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. अद्याप त्यांची रिपोर्ट आलेली नाही. सर्व रुग्णांचे सीटी स्कॅन आणि एक्सरे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. विशेष म्हणजे, सर्व रुग्ण वेगवेगळ्या परिसरातील आहेत. त्यांचा एकमेकांशी कोणताच संबंध नाही. तरीदेखील या सर्वांमध्ये एकसारखेच लक्षणे दिसत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser