आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाईट कर्माचे फळ वाईट असते असे म्हणतात. हे आंध्र प्रदेशात खरे ठरले. येथे एका चोराने मंदिरातील दागिने चोरण्यासाठी भिंतीला छिद्र पाडले, मात्र तो स्वतःच त्यात अडकून बसला. त्याने लोकांना मदतीसाठी बोलावले असता त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
पापा राव नावाच्या चोराने आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम या किनारी जिल्ह्यातील जामी येल्लम्मा मंदिराची खिडकी फोडून देवतेला अर्पण केलेले दागिने चोरले. बाहेर पडण्यासाठी त्याने भिंतीला छिद्र पाडले, पण तो छिद्रातून बाहेर येतान अर्ध्यातच अडकून बसला.
अनेक तास उलटूनही तो निघू शकला नाही, तेव्हा त्याने रडून लोकांना मदतीसाठी हाक मारली. यानंतर ग्रामस्थ तेथे जमा झाले. लोकांनी त्याला छिद्रातून बाहेर काढले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
वाईट कर्माचे वाईट परिणाम, वाचा अशाच दोन घटना
1. दानपेटीत अडकला चोराचा हात
अशीच एक घटना छत्तीसगडमधील कोरबा येथे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घडली होती, जेव्हा दोन चोरटे श्री सिद्ध वटेश्वर हनुमान शनी मंदिरात चोरी करण्यासाठी गेले होते. त्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला व दानपेटीतील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला असता पेटीच्या आत चोरट्याचा हात अडकला. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराच्या पुजाऱ्याने त्याला पाहिले आणि पोलिसांना कळवले. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
2. चोरीची रक्कम पाहून चोराला आला हार्ट अटॅक
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये चोरीचे पैसे पाहून एका चोराला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याने त्याच्या मित्रासोबत एका सर्व्हिस सेंटरमध्ये चोरी केली होती, तेथून दोघांनी 7 लाख रुपये चोरले. आपल्या हाताला काही हजार रुपये लागतील असे दोघांनाही वाटले, पण लाखो रुपये डोळ्यांसमोर पाहताच चोराला हृदयविकाराचा झटका आला. चोरीचा मोठा पैसा त्याच्या उपचारासाठी गेला. त्यानंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.