आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Anfan Cyclone Hits Bengal, 72 Died, Bengal Has Never Seen Such A Catastrophic : Mamata

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादळाने वाताहत:बंगालमध्ये अंफन वादळाने 72 लोकांचा मृत्यू, असे भयंकर नुकसान कधीच पाहिले नाही : ममता

कोलकाता/नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 60 तास आधी अचूक इशारा दिल्याने हजारोंचे प्राण वाचले

या शतकातील सर्वात शक्तिशाली अंफन चक्रीवादळ बंगालमध्ये प्रचंड नुकसान करून बांगलादेशच्या दिशेने वळले आहे. यामुळे आसाम, मेघालयात शुक्रवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस पडेल. या वादळात गुरुवारी सायंकाळपर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंंत्री ममता बॅनर्जी यांनी अशी वाताहत आपण जीवनात प्रथमच पाहत असल्याचे म्हटले आहे. ५५०० घरे उद्ध्वस्त झाली असून राज्यात प्रचंड नुकसान झाले आहे. पंतप्रधानांनी बंगाल दौरा करून परिस्थितीची पाहणी करावी, असे आवाहनही ममतांनी केले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले की, “मी छायाचित्रे पाहिली. या संकटात देश बंगालच्या पाठीशी उभा आहे.’ या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गृहमंत्रालयाची पथके प. बंगालला जातील.

बचावकार्यासाठी अतिरिक्त पथके

अपेक्षेपेक्षाही अधिक नुकसान झाल्याने एनडीआरएफची पथके कोलकात्याला रवाना झाली. बंगालमध्ये अगोदरच ४१ पथके होती. याशिवाय लष्कर, नौदल, हवाईदलाची पथकेही सज्ज होती. नुकसानीचा अद्याप अंदाज आलेला नाही.

7 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते

एनडीआरएफने दोन्ही राज्यांतील ७ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते. बंगालमध्ये ५ लाख लोकांना किनारपट्टी भागातून हलवण्यात आले. येथे कोलकाता, हावडा, हुगळीसह सहा जिल्ह्यांत वादळामुळे प्रचंड नुकसान. घरांसह विजेचे खांब, मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले.

> 70 किमी ताशी वेगाने वारे

> 01 हजार मोबाइल टाॅवर कोसळले, इंटरनेट बंद

> 55 हजार घरे उद्ध्वस्त, शेकडो रस्ते बंद

बातम्या आणखी आहेत...