आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाइल्डलाइफ:देशातील पहिल्या 16 किलाेमीटर अॅनिमल अंडरपासमधून 10 महिन्यांत साडेपाच हजार प्राण्यांचा प्रवास, 78 कॅमेऱ्यांची नजर

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्माएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अॅनिमल क्रॉसिंग स्ट्रक्चरमुळे वन्य प्राण्यांना वाहनांनी चिरडल्याच्या घटना टळल्या

देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्ग-४४ च्या १६ किमी परिसरात बनवण्यात आलेल्या ९ अॅनिमल अंडरपासमधून १० महिन्यांत ८९ वेळा वाघ गेल्याची नोंद झाली आहे. १८ प्रकारचे ५४५० वन्य प्राणी या अंडरपासमधून गेले. पेंच व्याघ्र प्रकल्पात उभारण्यात आलेल्या या जगातील सर्वात लांब अॅनिमल क्रॉसिंग स्ट्रक्चरमुळे वन्य प्राण्यांना वाहनांमुळे होणाऱ्या धोक्याच्या हजारो घटनाही टळल्या आहेत. भारतीय वन्यजीव संस्थेच्या अॅनिमल अंडरपासचा वन्य प्राण्यांकडून होत असलेल्या वापरावरील अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे.

अहवाल तयार करणारे डॉ. बिलाल हबीब यांनी सांगितले, श्रीनगर ते कन्याकुमारीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ४४ ला दुपदरीवरून चारपदरी करण्याचे ठरल्यानंतर या दाट जंगल असलेल्या भागात प्राण्यांना जाण्यासाठी अॅनिमल क्रॉसिंग स्ट्रक्चर बनवण्याच्या अटीवरच या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्रात एनएच- ४४ वर २५५ कोटी रुपये जादा खर्च करून प्राण्यांना जाता यावे म्हणून चार लहान पूल आणि पाच अॅनिमल अंडरपास करण्यात आले. फक्त प्राण्यांसाठी समर्पित अशा प्रकारचे हे जगातील सर्वात लांबीचे बांधकाम आहे. यात प्राण्यांच्या येण्या-जाण्यावर देखरेख ठेवण्यासाठी ७८ कॅमेरे लावण्यात आले. भविष्यात हा प्रयोग अत्यंत महत्त्वाचा पथदर्शक ठरेल.

डॉ. हबीब यांनी सांगितले की, जर हे पूल नसते तर प्राणी रस्त्यावरून वाहनांच्या वर्दळीतून गेले असते आणि प्रत्येक वेळी अपघाताची भीती राहिली असती. मात्र, या पुलामुळे हजारो अपघात टळले. ४०० ते ५०० किलोची जंगली म्हैस या काळात सुमारे ५० वेळा गेली. तिला एखाद्या कारने धडक दिली असती तर गाडी उलटणे ठरलेले. यामुळे प्राणी तर जखमी झालाच असता तसेच मनुष्य आणि गाडीचेही नुकसान झाले असते. येत्या ५-६ वर्षांत देशात सुमारे ५० हजार किमी लांबीचे नवीन रस्ते आणि जुन्या रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. यातील सुमारे २० हजार किमीचा भाग देशात व्याघ्र प्रकल्पातून जातो. यामुळे हा अहवाल भविष्यात वन्य प्राणी संरक्षणासाठी महत्त्वाचा आहे.

बातम्या आणखी आहेत...