आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Animal Trafficking : CBI Raids In 4 States, Including India Bangladesh Border, Crime On Former Commandant

पशू तस्करी:भारत-बांगलादेश सीमेसह 4 राज्यांमध्ये सीबीआयचे छापे, माजी कमांडंटवर गुन्हा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • पाच शहरांतील 13 ठिकाणी छापे, माजी कुलपतींविरोधात गुन्हा

भारत-बांगलादेश सीमेवर पशूंच्या तस्करीप्रकरणी सीबीआयने सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) ३६ व्या बटालियनचे माजी कमांडंट सतीशकुमार व इतर तीन जणांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्याचबरोबर सीबीआयने चार राज्यांच्या पाच शहरांतील १३ ठिकाणांवर छापे मारले. पश्चिम बंगालच्या कोलकाता व मुर्शिदाबाद, उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद, पंजाबच्या अमृतसर व छत्तीसगडच्या रायपूरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

सीबीआयने एफआयआर दाखल केलेल्या इतर तीन नावांत इनामुल हक, अनारुल शेख व मोहंमद गुलाम मुस्तफा यांचा समावेश आहे. सतीशकुमार रायपूरमध्ये अाहे. बांगलादेशला लागून असलेल्या सीमा सुरक्षेची जबाबदारी बीएसएफकडे आहे. सीबीआय अधिकारी म्हणाले, सीमेवर पशू तस्करीशी संबंधित तपास एक वर्षापासून केला जात आहे. बांगलादेश सीमेवर पशू तस्करी मोठी समस्या आहे. सीमा ओलांडण्यासाठी तस्कर पशूंच्या गळ्यात बाॅम्ब लावतात. त्यामुळे जनावरांना पकडण्याच्या प्रयत्नात अनेकदा जवान जखमी होतात.

माजी कुलपतींविरोधात गुन्हा

सीबीआयने विश्वभारती विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुशांत दत्तगुप्ता यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एफआयआर दाखल केला. त्यांच्या विरोधातील दोन वर्षांच्या चौकशीनंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे निवृत्तिवेतन मिळत असल्याची माहिती दडवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विश्वभारती विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी ही माहिती दडवली. अशा प्रकारे त्यांनी १३ लाख रुपयांचे फसवणूक केली. त्यांच्यावर एका खासगी लॉ फर्मला नियोजित शुल्कापेक्षा जास्त निधी दिल्याचा आरोप आहे.