आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील कांजवाला हिट अँड रन प्रकरणाच्या फॉरेन्सिक अहवालात अंजली कारमध्ये असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. बुधवारी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या अहवालानुसार, अंजली कारच्या पुढील डाव्या टायरमध्ये अडकली होती. कारण या टायरच्या मागे रक्ताचे बहुतेक डाग आढळले होते. कारच्या खाली इतर भागातही रक्ताचे डाग आढळून आले.
पीडित मुलीच्या फॅमिली डॉक्टरांनी अंजलीच्या नशेत असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, शवविच्छेदन अहवालात मृताच्या पोटात दारू नसल्याचे आढळून आले.
त्यांनी सांगितले, 'शवविच्छेदन अहवालानुसार पोटात अन्न आढळले. तिने (अंजली) पेय घेतले असते तर केमिकलची उपस्थिती अहवालात नमूद करण्यात आली असती. परंतु अहवालात फक्त पोटात अन्न आढळे आहे. डॉक्टरांनीही ही सामान्य हत्या नसल्याचे म्हटले. मृत्यूपूर्वी अंजलीवर खूप अत्याचार करण्यात आले. तिच्या शरीरावर 40 जखमा होत्या.
निधी म्हणाली होती - अंजली दारू पिऊन गाडी चालवत होती
अंजलीची मैत्रीण निधीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, अपघातात कारस्वारांची चूक होती. मात्र, अजंली देखील नशेत होती. मी स्कूटी चालवू का अशी विनंती अंजलीला केली होती. पण तिने मला स्कूटी चालवायला दिली नाही. त्यानंतर काही वेळाने कारची धडक झाली. तेव्हा मी एका बाजूला फेकले गेले. ती गाडीखाली अडकली. त्यानंतर कारने तिला फरफटत नेले. मला हे सर्व पाहून भीती वाटली म्हणून मी तेथून पळ काढला आणि कोणालाही काही सांगितले नाही. त्याचवेळी आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, स्कूटी रस्त्यावर स्थिर चालत नव्हती. अशातच हा अपघात झाला. दरम्यान, पोलिस दोन्ही बाजूंची तपासणी करित आहेत.आम्ही दोघीही हॉटेलमध्ये एकत्र होतो.
दुसरीकडे आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, स्कूटी रस्त्यावर डुलत डुलत जाती होती, म्हणून ही धडक बसली. सध्या पोलिस दोन्ही बाजूंच्या जबाबाची पडताळणी करत आहेत.
कुटुंबीय म्हणाले- निधी खोटे बोलत आहे
अंजलीच्या कुटुंबीयांनी ही नियोजित हत्या असल्याचे म्हटले आहे. निधी पूर्णपणे खोटे बोलत असल्याचे ते म्हणाले. स्कूटीवर बसलेल्या दोन जणांचा अपघात होतो आणि एकाचा मृत्यू होतो, पण दुसरा काही मदत न करता तेथून पळून जातो. अचानक पुन्हा साईड हिरोईन 75 तासांनंतर येते आणि खोटी गोष्ट सांगते. त्यांनी निधीचे आरोप फेटाळून लावले आहेत. कुटुंबीय म्हणाले की, कोणती मैत्रिण ही अपघातानंतर गायब होते. अंजलीवर अत्याचार झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. अंजलीच्या मृतदेहासोबत मेंदू सापडला नाही, असेही त्यांनी सांगितले.
या घटनेशी संबंधित आजचे 6 मोठे अपडेट्स
निधी घरी परतल्याचा व्हिडिओ
दिव्य मराठी न्यूज नेटवर्कचे रिपोर्टरने निधीच्या शेजाऱ्यांशी संवाद साधला आहे. त्याने नाव न सांगता संपूर्ण घटना सांगितली. शेजारी म्हणाला- निधी परत आली तेव्हा ते 3 ते 4 वाजले होते. तेव्हा काही लोक शेकोटी करून बसले आहे. निधीने सर्वप्रथम तिच्या घराचे गेट ठोठावले. गेट न उघडताच ती त्यांच्याकडे आली. ती घाईत होती. तिचा फोन बंद होता. यानंतर सकाळी निधीनेही सर्वांना सांगितले होते की, तिचा अपघात झाला आहे, पण तिच्यासोबत दुसरी मुलगी असल्याचे तिने सांगितले नव्हते
आतापर्यंतच्या घटना अशाप्रकारे समजून घ्या...
31 डिसेंबर : कांजवाला परिसरात दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली स्कूटीवरून घरी परतत होती. कारने 5 तरुणांना धडक दिली. अपघातानंतर तरुणांनी कारसह पळ काढला. अंजली गाडीखाली अडकली होती. त्याला 12 किमीपर्यंत फरफटत नेले. अपघातानंतर निधी घटनास्थळावरून पळून घरी गेली होती.
1 जानेवारी: पोलिसांनी या प्रकरणी मनोज मित्तल, दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णा आणि मिथुन या पाच आरोपींना अटक केली. गाडीही जप्त करण्यात आली. डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, शनिवार-रविवारच्या मध्यरात्री पहाटे तीन वाजता पोलिसांना माहिती मिळाली की कांझावाला भागात एक मुलगी रस्त्याच्या कडेला विवस्त्र अवस्थेत पडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता, मुलीचा मृतदेह आढळून आला.
2 जानेवारी : सोमवारी सुलतानपूर ते कांझावाला भागापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. यामध्ये मुलगी गाडीखाली फरफटत नेली जात असल्याचे दिसत आहे. आम आदमी पार्टीने (आप) प्रदर्शन केले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
दुसरीकडे, संध्याकाळपर्यंत गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणाचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या महिला अधिकारी शालिनी सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला होता. दुसरीकडे, न्यायालयाने पाचही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शवविच्छेदन करण्यासाठी तीन सदस्यीय मंडळाची स्थापना करण्यात आली होती. दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांनी पोलिस आयुक्तांकडून स्टेटस रिपोर्ट मागवला आहे.
पोलिसांनी अपघात तर कुटुंबीयांनी खून म्हटले आहे.
पीडितेचे कुटुंबः आईने सांगितले की, तिने खूप कपडे घातले होते, परंतु जेव्हा तिचा मृतदेह सापडला तेव्हा ती पूर्णपणे नग्न होती. एकही कपडा नव्हता. हा कसला अपघात आहे?
पोलिसांचा दावा : डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, हे संपूर्ण प्रकरण अपघाताचे आहे. अपघातामुळे मुलीचे शरीर छिन्नविछिन्न झाले. रक्तस्त्राव झाला.
3 जानेवारी: स्कूटीवर सोबत असलेल्या निधिचा दावा, अंजील मद्यधुंद अवस्थेत होती
मंगळवारी याप्रकरणी निधी नावाच्या मुलीचा प्रवेश झाला होता. 31 डिसेंबरच्या रात्री अंजली आणि निधीचे फुटेज सापडले. त्या दोघी OYO हॉटेलच्या समोर होत्या. यामध्ये दोघीही स्कूटीजवळ बोलताना दिसत आहेत. यानंतर दोघेही स्कूटीवरून घराकडे निघाले.
नवीन वर्षाच्या पार्टीसाठी अंजली तिच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याचे तपासात समोर आले आहे. हॉटेल मॅनेजरने पोलिसांना सांगितले आहे की, मुलींचे मित्रांसोबत काही कारणावरून भांडण झाले आणि नंतर दोघींचे आपसातही भांडण झाले. तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना निघून जाण्यास सांगितले.
निधीने दावा केला, अंजिल खूप मद्यधुंद अवस्थेत होती. तिने मला स्कूटी चालवायला दिली नाही. कारने मला धडक दिल्यानंतर मी एका बाजूला पडले आणि ती गाडीखाली आली. ती गाडीखाली अडकली. गाडीने तिला ओढून नेले. मला भीती वाटली म्हणून मी निघून गेले आणि कोणाला काही सांगितले नाही.
दुसरीकडे, दुपारपर्यंत अंजलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्कार झाला नसल्याची पुष्टी झाली आहे. यामध्ये तिच्या शरीरावर 40 जखमा असल्याचे समोर आले आहे.
ना वेळेवर शवविच्छेदन, ना मेडिकल, पोलिस कुणाला वाचवताहेत?
दिल्लीतील कंझावाला प्रकरणात अंजलीचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यानुसार बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. या अहवालानंतरही पोलिसांच्या कारवाईवर आणि कहाणीवर प्रश्नचिन्ह कायम आहे.
एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये अंजली आणि तिची मैत्रीण निधी एका OYO हॉटेलच्या बाहेर दिसत आहेत. दोन्ही मुली स्कूटी वरून निघत आहेत आणि जवळच तीन मुलं उभी आहेत, त्यापैकी एक अंजलीसोबत बोलतही आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.