आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anjali Was Not Drunk, Friend's Claim Is False, Friend's Role Is Suspicious, New Twist In Anjali's Death Case

पोस्टमॉर्टेम अहवाल:अंजली नशेत नव्हती, मैत्रिणीचा दावा खोटा, मैत्रिणीची भूमिका संशयास्पद, मृत्यू प्रकरणाला नवे वळण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या कंझावाला भागात कारने १२ किमीपर्यंत फरफटत गेलेली तरुणी अंजली सिंहच्या मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. अंजलीच्या पोस्टमॉर्टेम अहवालात तिने मद्यपान केल्याचा उल्लेख नाही. हा दावा तिची मैत्रीण निधीच्या जबाबाहून भिन्न आहे. घटनेच्या रात्री अंजलीने मद्य प्राशन केलेले होते, असे निधीने म्हटले होते. बुधवारी अंजलीचे फॅमिली डॉक्टर भूपेंद्र चौरसिया यांनी अहवालाच्या आधारे निधीचा दावा फेटाळून लावला. अंजलीच्या पोटात केवळ अन्न असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तिने मद्यपान केले असते तर निश्चितपणे ऑटोप्सीमध्ये केमिकलचा उल्लेख असता. अंजलीचा मेंदू सापडला नसल्याचे पोस्टमॉर्टेममध्ये म्हटले आहे. काही किलोमीटर फरफटत गेल्यामुळे तिचा मेंदू कवटीतून बाहेर पडला असावा असा अंदाज आहे. ही सामान्य हत्या नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. मृत्यूपूर्वी अंजलीचा खूप छळ झाला. तिच्या शरीरावर ४० घाव होते. पीडितेच्या नातेवाइकांनी निधीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निधी खोटे बोलत असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. १ जानेवारीला पहाटे कंझावाला भागात अंजलीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत रस्त्याच्या कडेला होता. पोलिसांनी या प्रकरणात सुलतानपूर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या घटनेत पाच आरोपी अटकेत आहेत. ते पोलिस कोठडीत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे घटनेच्या रात्री निधी देखील अंजलीसोबत होती, असे तपासात स्पष्ट झाले आहे.

रात्री अडीचच्या सुमारास दरवाजा ठोठावताना निधी दिसली..
प्रकरणात नवे सीसीटीव्ही फुटेज समाेर आले आहे. त्यात अंजलीची मैत्रीण निधी रात्री २.३० च्या सुमारास घराबाहेर उभी असल्याचे दिसून येते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये निधीला उशिरा रात्री घरात जाताना दिसते. तिच्या घरापासून काही अंतरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निधी आपल्या घराचा दरवाजा ठोठावताना दिसून आली आहे.

यादरम्यान ती अस्वस्थ दिसून आली. रात्री १ वाजून ४५ वाजता हॉटेल सोडल्याचे फुटेजवरून दिसून येते. त्या रात्री निधीच्या शेजारी राहणारा राहुल आपल्या भावासोबत शेकोटीसमोर होता. राहुल म्हणाला, निधीकडे पाहून ती एखाद्या जीवघेण्या घटनेवरून परतल्यासारखे वाटले नाही. घटनेच्या रात्री एकच्या सुमारास आलेल्या कॉलनंतर ९ पोलिस कन्ट्रोल रूम (पीसीआर) व्हॅन या कारचा पाठलाग करत होत्या. परंतु त्यांना कारला पकडा आले नव्हते, असे पोलिस तपासात समोर आले आहे.

अशी कशी मैत्रीण : निधी पळून का गेली? बोलली का नाही?
निधीने काही दावे केले आहेत. अंजलीचे एका हॉटेलमध्ये तिच्या बॉयफ्रेंडसोबत भांडण झाले होते. तो सोडून गेला. तेव्हा अंजलीने संतापात खूप मद्यपान केले. नंतर जाण्यासाठी स्कूटी स्वत: चालवण्याचा हट्ट केला. ऐकत नसल्याने चावी दिली. नंतर कारला धडक झाली. भीती वाटल्याने पळाले, असे निधीचे म्हणणे आहे. परंतु पीडितेचे नातेवाईक, दिल्ली महिला आयोगाच्या मालीवाल यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

दुर्घटनेवेळी अंजलीसोबत निधीही होती. ती घटनास्थळाहून पळाली. अंजलीचे कुटुंब किंवा पोलिसांना त्याबद्दल माहिती देणे निधीला गरजेचे वाटले नाही? अंजलीला फरफटत नेणाऱ्या कारचा ती पाठलाग करू शकत होती. अंजलीचे प्राण वाचवण्यासाठी ती प्रयत्न करू शकत होती. ती कशाप्रकारचे मैत्रीण आहे? निधीच्या भूमिकेचाही तपास केला जावा. ती घटनास्थळी होती किंवा नाही, हे तपासले पाहिजे. स्कूटीवर निधीही पाठीमागे बसली होती. मग कारशी टक्कर झाल्यानंतर तिला एकही जखम कशी झाली नाही?

फाॅरेन्सिक : कारमध्ये पुरावे नाहीत
फॉरेन्सिक टीमच्या म्हणण्यानुसार कारच्या खालच्या भागात ब्लड स्टेन मिळाले.ते डाव्या बाजूच्या समोरील भागात व मागील चाकाच्या खाली आहे. अंजली कारच्या डाव्या बाजूच्या समोरील चाकात अडकली होती. अंजली कारच्या मधे असल्याचे काहीही पुरावे आढळलेले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...