आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ankita Bhandari Murder Case Update | Killers To Be Narco tested Uttarakhand Police | Marathi News

अंकिता भंडारीच्या मारेकऱ्यांची होणार नार्को चाचणी:आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी टेस्टची मागणी : उत्तराखंड पोलीस

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंड वनंतरा रिसॉर्ट रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी न्यायालयात अपील करण्यात आले आहे. मंजुरी मिळताच नार्को चाचणी केली जाईल. चाचणी झाल्यानंतर अंकिता भंडारी खून प्रकरणाचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे.

18 सप्टेंबर रोजी खुनाच्या आरोपींनी भंडारी यांना चिल्ला कालव्यात ढकलले होते. 24 सप्टेंबर रोजी अंकिताचा मृतदेह सापडला होता.

पोलिसांना पुरावे मजबूत करायचे आहेत
वृत्तानुसार, पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपीना कठोर शिक्षा व्हावी, त्यासाठी तिन्ही आरोपींविरुद्धचे पुरावे मजबूत करायचे आहेत. त्यामुळे तिघांचीही नार्को चाचणी करण्याची परवानगी मिळावी यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील वनंतरा रिसॉर्टमध्ये 19 वर्षीय रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी हिची रिसॉर्ट मालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी हत्या केली होती.

22 सप्टेंबर रोजी हे प्रकरण महसूल पोलिसांकडून नियमित पोलिस दलाकडे सोपवण्यात आल्यानंतर रिसॉर्ट मालक पुलकित आर्यसह सर्व आरोपींना 24 तासांच्या आत अटक करण्यात आली.

आरोपी पुलकित हा भारतीय जनता पक्षाचे माजी नेते विनोद आर्य यांचा मुलगा आहे. खून प्रकरणात त्यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...