आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडच्या अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास पूर्ण झाला आहे. SIT अर्थात विशेष तपास पथक सोमवारी कोटद्वारच्या स्थानिक न्यायलायात 500 पानी आरोपपत्र दाखल करणार आहे. तपासात अंकितावर व्हिआयपी पाहुण्यांना स्पेशल सर्व्हिस देण्याचा दबाव होता असे स्पष्ट झाले आहे. ADGP व्ही मुरुगेशन यांच्या माहितीनुसार, आरोपपत्रात 100 साक्षीदारांचे जबाब नमूद आहेत. तसेच पुरावे म्हणून 30 माहितीपटाच्या क्लिपही आहेत.
ऋषीकेशच्या वनंतरा रिसॉर्टमध्ये 19 वर्षीय रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारीच्या आरोपींनी 18 सप्टेंबर रोजी चिल्ला कालव्यात ढकलून दिले होते. तिचा मृतदेह 24 सप्टेंबर रोजी आढळला होता.
अंकिताच्या मित्राने सांगितली होती ही गोष्ट
दिव्य मराठीच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये अंकिताचे काही चॅट्स आढळले होते. त्यात अंकिताने आपला मित्र पुष्पदीपला सांगितले होते की, तिच्यावर रिसॉर्टमध्ये येणाऱ्या व्हिआयपी पाहुण्यांना स्पेशल सर्व्हिस देण्याचा दबाव होता. तिच्यावर बळजबरी करण्यात आली. तसेच प्रॉस्टिट्यूट बनण्यासाठी 10 हजार रुपयांचे आमिषही दाखवण्यात आले.
SIT च्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, "अंकिता रिसॉर्टच्या एका माजी कर्मचाऱ्याच्या संपर्कात असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्याने रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या अवैध कारवायांचीही माहिती दिली. हे काम करण्यासाठी चांगले स्थान नसल्याचे त्याने सांगितले होते.
अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वच आरोपींची नार्को टेस्टही होईल. यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. मंजुरी मिळताच सर्वांची नार्को टेस्ट केली जाईल.
या बातम्याही वाचा...
रिसॉर्टच्या कर्मचाऱ्याने सांगितले- 4 लोक आले होते
उत्तराखंडच्या वनंतरा रिसॉर्टशी संबंधित अंकिता हत्याकांडात आणखी एक खुलासा झाला आहे. हत्याकांड करण्यापूर्वी चार VIP गेस्ट काळ्या कारमधून रिसॉर्टमध्ये आले होते. व्हीआयपी गेस्टमध्ये या लोकांसाठीच मुख्य आरोपी पुलकित आणि इतर दोघे अंकितावर दबाव आणत होते. दबावाला बळी न पडल्यामुळेच अंकिताची हत्या करण्यात आली. आता पोलीस या चार गेस्टचा शोध घेत आहेत. संपूर्ण बातमी वाचा
गरीब आहे म्हणून स्वतःला 10 हजारात विकू का
अंकीता भंडारी, वय केवळ 19 वर्षे. गत 28 ऑगस्ट रोजी ऋषिकेशच्या वनंतरा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम सुरू केले. शनिवारी सकाळी तिची डेडबॉडी एका कालव्यात आढळली. प्रकरण हत्येचे आहे. आरोप रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य, मॅनेजर सौरभ भास्कर व अंकित गुप्तावर आहे.
दिव्य मराठीच्या हाती अंकिताचे काही चॅट्स लागलेत. त्यात अंकिताने आपल्या मित्राला सांगितले होते की, तिच्यावर रिसॉर्टमध्ये येणाऱ्या VIP पाहुण्यांना स्पा सर्व्हिस देण्यासाठी दबाव टाकला जात आहे. तिच्यावर बळजबरी करण्यात आली. प्रॉस्टिट्यूट अर्थात वेश्या बनण्यासाठी 10 हजारांचे आमिष दाखवण्यात आले. तुला पाहुण्यांना हँडल करावे लागेल. नाही तर तुला काढून टाकले जाईल, असेे तिला सांगण्यात आले होते. वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.