आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडच्या अंकिता भंडारी हत्या प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यासाठी कोटद्वार न्यायालयात अपील करण्यात आले. मान्यता मिळाल्यास नार्को चाचणी केली जाईल. चाचणी घेऊनच अंकिता भंडारी खून प्रकरणाचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे.
18 सप्टेंबर रोजी आरोपींनी अंकिताला चिल्ला कालव्यात ढकलले होते. 24 सप्टेंबर रोजी अंकिताचा मृतदेह सापडला होता.
पोलिसांना पुरावे मजबूत करायचे आहेत
वृत्तानुसार, पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांना तिन्ही आरोपींविरुद्धचे पुरावे मजबूत करायचे आहेत आणि त्यांना कठोर शिक्षा द्यायची आहे. त्यामुळे तिघांचीही नार्को चाचणी करण्याची परवानगी मिळावी यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. उल्लेखनीय म्हणजे, उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील वनंतरा रिसॉर्टमध्ये 19 वर्षीय रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारीची रिसॉर्ट मालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी हत्या केली होती.
22 सप्टेंबर रोजी हे प्रकरण महसूल पोलिसांकडून नियमित पोलिस दलाकडे सोपवण्यात आल्यानंतर रिसॉर्ट मालक पुलकित आर्यसह सर्व आरोपींना 24 तासांच्या आत अटक करण्यात आली. आरोपी पुलकित हा भारतीय जनता पक्षाचे माजी नेते विनोद आर्य यांचा मुलगा आहे. खून प्रकरणात त्यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
स्पेशल सर्व्हिस देण्यासाठी अंकितावर दबाव
उत्तराखंडच्या वनंतरा रिसॉर्टशी संबंधित अंकिता हत्याकांडात आणखी एक खुलासा झाला आहे. हत्याकांड करण्यापूर्वी चार VIP गेस्ट काळ्या कारमधून रिसॉर्टमध्ये आले होते. व्हीआयपी गेस्टमध्ये या लोकांसाठीच मुख्य आरोपी पुलकित आणि इतर दोघे अंकितावर दबाव आणत होते. दबावाला बळी न पडल्यामुळेच अंकिताची हत्या करण्यात आली. आता पोलीस या चार गेस्टचा शोध घेत आहेत. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
गरीब आहे म्हणून स्वतःला 10 हजारात विकू का
अंकीता भंडारी, वय केवळ 19 वर्षे. गत 28 ऑगस्ट रोजी ऋषिकेशच्या वनंतरा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम सुरू केले. शनिवारी सकाळी तिची डेडबॉडी एका कालव्यात आढळली. प्रकरण हत्येचे आहे. आरोप रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य, मॅनेजर सौरभ भास्कर व अंकित गुप्तावर आहे. दिव्य मराठीच्या हाती अंकिताचे काही चॅट्स लागलेत. त्यात अंकिताने आपल्या मित्राला सांगितले होते की, तिच्यावर रिसॉर्टमध्ये येणाऱ्या VIP पाहुण्यांना स्पा सर्व्हिस देण्यासाठी दबाव टाकला जात आहे. तिच्यावर बळजबरी करण्यात आली. प्रॉस्टिट्यूट अर्थात वेश्या बनण्यासाठी 10 हजारांचे आमिष दाखवण्यात आले. तुला पाहुण्यांना हँडल करावे लागेल. नाही तर तुला काढून टाकले जाईल, असे तिला सांगण्यात आले होत. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अंकिता हत्याकांडातील तो VIP कोण?
उत्तराखंडमधील 19 वर्षीय अंकिता भंडारीच्या हत्येपासून अंत्यसंस्कारापर्यंत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हत्येचा आरोप माजी मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्यवर आहे. तो अंकिताच्या हत्येनंतर 4 दिवस फरार होता. पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला नाही. अंकिताचा फोटो व्हायरल झाल्यानंतर जनता रस्त्यावर उतरली. त्यानंतर पुलकितच्या कुटुंबीयाने त्याला वाचवण्यासाठी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर अंकिताचा मृतदेह हस्तगत करण्यात आला. यावेळी भाजपच्या महिला आमदार रेणू बिष्ट अत्यंत सक्रिय दिसून आल्या. त्यांच्याही अनेक ठिकाणच्या उपस्थितीवर सवाल उपस्थित होत आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.