आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडच्या वनंतरा रिसॉर्टशी संबंधित अंकिता हत्याकांडात आणखी एक खुलासा झाला आहे. हत्याकांड करण्यापूर्वी चार VIP गेस्ट काळ्या कारमधून रिसॉर्टमध्ये आले होते. व्हीआयपी गेस्टमध्ये या लोकांसाठीच मुख्य आरोपी पुलकित आणि इतर दोघे अंकितावर दबाव आणत होते. दबावाला बळी न पडल्यामुळेच अंकिताची हत्या करण्यात आली. आता पोलीस या चार गेस्टचा शोध घेत आहेत.
काळ्या रंगाच्या आलिशान कारने 4 जण आले होते
रिसॉर्टचे कर्मचारी अभिनव यांनी सांगितले की, हत्याकांडाच्या दिवशी दुपारी एक काळ्या रंगाची आलिशान कार रिसॉर्टमध्ये आली होती. त्यात चार तरुण होते, ज्यांचे वय अंदाजे 34-35च्या जवळपास होते. यापूर्वीही ते एकदा आले होते आणि त्या दिवशीही अंकिता आणि पुलकितमध्ये भांडण झाले होते. अभिनवने सांगितले की, चौघे 18 सप्टेंबरला पुन्हा आले होते. तेव्हा मी त्यांच्या गाडीतील सामान खोलीत नेत होतो.
त्यावेळी वरच्या मजल्यावरून मला दिसले की अंकिता मॅडम रडत आहेत आणि मोठमोठ्याने ओरडत आब्रू वाचवण्याची विनंती करत आहेत. तेवढ्यात पुलकित आतून आला आणि अंकिताचा हात पकडून तिला आत ओढत नेले.
अभिनव 15 सप्टेंबरपासून रिसॉर्टमध्ये काम करत होता
अभिनवच्या म्हणण्यानुसार, अंकिता आणि पुलकित यांच्यात वाद सुरू असताना ते चार तरुण पुन्हा कारमध्ये बसून रिसॉर्टमधून निघून गेले. काही वेळाने पुलकित, सौरभ आणि भास्कर देखील अंकितासोबत बाहेर गेले. अभिनवने सांगितले की, त्याने 15 सप्टेंबर रोजी रिसॉर्टमध्ये नोकरी सुरू केली. त्यामुळे याआधी घडलेल्या घटनांची माहिती त्याला नाही.
एक मोबाइल फोन जप्त
तपास पथकाला चिला कालव्याजवळ मोबाइल सापडला आहे. तो फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आतापर्यंत एसआयटीला अंकिताचा मोबाइल सापडलेला नाही. तो मिळाल्यावर एसआयटीला अनेक महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी पुलकित आर्य याचा मोबाइलही गायब आहे. कोणाचा फोन जप्त करण्यात आला हे या तपासानंतरच समजेल. जप्त केलेला फोन महत्त्वाचा दुवा ठरू शकतो.
पटवारीला एसआयटीने अटक केली
पटवारी वैभव प्रताप याला एसआयटीने हत्येप्रकरणी अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले होते. सीएम पुष्कर सिंह धामी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयपीएस पी रेणुका देवी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी टीम तयार केली आहे.
आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, अंकिताचे वडील पहिल्यांदा महसूल पोलिस यंत्रणेचे स्थानिक पटवारी आणि महसूल निरीक्षक वैभव प्रताप सिंग यांच्याकडे हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्यांची सुनावणी झाली नाही. तक्रारीचा अहवालही नोंदवला गेला नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.