आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टगरीब आहे म्हणून स्वतःला 10 हजारात विकू का:अंकितावर गेस्टला स्पा सर्व्हिस देण्याचा होता दबाव, मित्रासोबतच्या चॅटमधून खुलासा

वैभव पळणीटकर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंकीता भंडारी, वय केवळ 19 वर्षे. गत 28 ऑगस्ट रोजी ऋषिकेशच्या वनंतरा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम सुरू केले. शनिवारी सकाळी तिची डेडबॉडी एका कालव्यात आढळली. प्रकरण हत्येचे आहे. आरोप रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य, मॅनेजर सौरभ भास्कर व अंकित गुप्तावर आहे.

दिव्य मराठीच्या हाती अंकिताचे काही चॅट्स लागलेत. त्यात अंकिताने आपल्या मित्राला सांगितले होते की, तिच्यावर रिसॉर्टमध्ये येणाऱ्या VIP पाहुण्यांना स्पा सर्व्हिस देण्यासाठी दबाव टाकला जात आहे. तिच्यावर बळजबरी करण्यात आली. प्रॉस्टिट्यूट अर्थात वेश्या बनण्यासाठी 10 हजारांचे आमिष दाखवण्यात आले. तुला पाहुण्यांना हँडल करावे लागेल. नाही तर तुला काढून टाकले जाईल, असेे तिला सांगण्यात आले होते.

पुलकित आर्यचे रिसॉर्ट, जिथे अंकिता काम करत होती. हत्येची गोष्ट उजेडात आल्यानंतर स्थानिकांनी रिसॉर्ट पेटवून दिले.
पुलकित आर्यचे रिसॉर्ट, जिथे अंकिता काम करत होती. हत्येची गोष्ट उजेडात आल्यानंतर स्थानिकांनी रिसॉर्ट पेटवून दिले.

17 सप्टेंबर रोजी मित्राशी झाली होती चर्चा

हे चॅट 17 सप्टेंबरचे म्हणजे अंकिताचे डेडबॉडी मिळण्याच्या 7 दिवस अगोदरचे आहे. 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा. रिसॉर्ट मालक पुलकित, सौरभ व अंकित अंकिताच्या खोलीत गेले. तिथे अंकिता जोर-जोरात रडत होती. तसेच मदतीसाठी ओरडत होती.

पुलकित आर्य भाजप नेते व माजी मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा आहे. तिन्ही आरोपी 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी अंकिताला दुचाकीवरून कुठेतरी घेऊन गेले. परत आल्यानंतर अंकिता त्यांच्यासोबत नव्हती. ही गोष्ट रिसॉर्टच्या एका कर्मचाऱ्याने सांगितली.

पोलिसांनी ऋषिकेशच्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले होते. त्यात त्यांनाही रिसॉर्टवरून 4 जण गेल्याचे व तिघेच परतल्याचे दिसून आले. 19 सप्टेंबर रोजी अंकिता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली.

बेपत्ता झाल्यानंतर 6 दिवसांनी अंकिताचा मृतदेह कालव्यात आढळला. FIR नुसार, धक्काबुक्कीनंतर पुलकित व त्याच्या सहकाऱ्यांनी अंकिताला कालव्यात ढकलून दिले.
बेपत्ता झाल्यानंतर 6 दिवसांनी अंकिताचा मृतदेह कालव्यात आढळला. FIR नुसार, धक्काबुक्कीनंतर पुलकित व त्याच्या सहकाऱ्यांनी अंकिताला कालव्यात ढकलून दिले.

मित्राने फोन केला, आरोपीने सांगितले अंकिता झोपत आहे

अंकिताचे चॅट तिच्या जम्मूत राहणाऱ्या मित्राने दिव्य मराठीला दिला आहे. आम्ही मित्राची ओळख सार्वजनिक करत नाही. त्याची अंकिताशी रोज चर्चा व्हायची. 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे 8 वाजता मित्राचे अंकिताशी बोलणे झाले नाही. त्यावर काहीतरी गडबड असल्याचे त्याला वाटले.

त्याने रिसॉर्ट मालक पुलकित आर्यला फोन लावला. पण उत्तर मिळाले की, अंकिता आपल्या खोलीत झोपली आहे. दुसऱ्या दिवशी पुलकितचा फोन स्विच ऑफ झाला. त्यानंतर मित्र जम्मूहून ऋषिकेशला आला. तसेच माध्यमांना अंकिताचा मुद्दा मांडण्याची विनंती केली.

आमच्याकडे चॅटचे स्क्रीनशॉट्स आहेत. त्यावरून अंकितावर पाहुण्यांना स्पा व इतर स्पेशल सर्व्हिस देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे स्पष्ट होते.

17 सप्टेंबर (अंकिता बेपत्ता होण्यापूर्वीचा दिवस)
वेळ - रात्री 9.35 वा.

अंकिता- या रिसॉर्टमध्ये खूप असुरक्षित वाटत आहे. मी काय बोलू, अंकित माझ्याकडे आला व म्हणाला तुझ्याशी काही तरी बोलायचे आहे. मी त्याच्यासोबत गेले.

मित्र - फोन करून सांग काय झाले?

अंकिता- नको, आवाज येईल.

मित्र - चल, असेच मेसेज करुन सांग.

अंकिता- तो म्हणाला की सोमवारी व्हिआयपी गेस्ट येत आहेत. त्यांना एक्स्ट्रा सर्व्हिस हवी आहे. मी म्हणाले, मग मी काय करू. तो म्हणाला की, तू सांगत होती की स्पा वगैरे करेल. मी म्हटले की, एक्स्ट्रा सर्व्हिसची गोष्ट झाली होती, स्पा देण्याची बाब कुठून आली. त्यावर तो म्हणाला की गावंढळ गोष्टी करू नको, गेस्ट पाहत आहेत.

मित्र - तू स्पाविषयी काय म्हटले होते?

अंकिता- अंकित म्हणाला की, हे तुला करावेच लागेल असे मी म्हणत नाही. पण तुझ्या ओळखीची एखादी मुलगी असेल तर सांग. कारण, गेस्ट 10 हजार रुपये देण्यासाठी तयार आहेत.

मित्र - त्यांना सांग की मी चांगल्या घरातील मुलगी आहे. अशी सर्व्हिस देऊ शकत नाही.

अंकिता- हो, मी त्यांना सांगितले की मी गरीब आहे म्हणून तुमच्या या रिसॉर्टसाठी स्वतःला 10 हजारात विकेल असे तुम्हाला वाटले काय. मला माहिती होते की तो दुसऱ्या मुलीची गोष्ट यासाठी सांगत होता की, मी 10 हजारांच्या आमिषापोटी स्पा देण्यासाठी तयार होईल. एक्स्ट्रा सर्व्हिसचा अर्थ सेक्शुअल रिलेशन आहे.

मित्र - हो, माहिती आहे.

अंकिता- या आर्यने सौरभ बिष्टला आपल्या खोलीत बोलावले व जवळपास 1 तास चर्चा केली. अंकित ही चर्चा केल्यानंतर म्हणाला - सरांना (आर्य) सांगू नको. पण मला माहिती आहे की आर्यला सर्वकाही ठावूक आहे. मी पैशांसाठी होकार द्यावा यासाठी या तिघांनी जाणिवपूर्वक हे कुभांड रचले.

मित्र - अशा ऑफर्स घेऊन येऊ नका, असे त्यांना समजावून सांग.

अंकिता- यापुढे त्यांनी काही म्हटले तर मी हेच काम करेल. खूप वाईट हॉटेल आहे हे. रिसॉर्टमध्ये एक व्यक्ती होती. त्याने मला अलिंगन दिले. त्याने मद्यप्राशन केले होते. मी त्याला काहीच म्हटले नाही. अंकितही म्हणाला की काही बोलू नको. अन्यथा भांडण झाले असते.

मित्र - कोण आहे तो, त्याचा नंबर काढ. मी त्याला पर्सनली येऊन भेटतो.

अंकिताने रिसॉर्टच्या एका कर्मचाऱ्याशी संवाद साधला. आम्हाला एक ऑडिओ क्लिपही आढळली आहे. त्यात अंकिता ओरडत आहे व तिची बॅग वर घेऊन येण्यास सांगत आहे.

2 दिवस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

पौडीचे जिल्हा पत्रकार विजय रावत यांनी सांगितले की, मला ही घटना 20 तारखेला समजली. अंकिताचे वडील परेशान होते. एका चौकीतून दुसऱ्या चौकीत भटकत होते. प्रशासनही त्यांचे काही ऐकत नव्हते. त्याच दिवशी अंकिताच्या मित्राने माझ्याशी संपर्क साधला. त्याच्या प्रयत्नांमुळेच या घटनेतील लैंगिक शोषणाचा खुलासा झाला.

उत्तराखंडच्या दुर्गम भागात महसूल विभागच कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळतो. पटवारीने सुरूवातीला 2 दिवसांपर्यंत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच अंकिता बेपत्ता झाल्याचा दावा केला.

रिसॉर्टचे कर्मचारी मनवीर चौहान यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास मला अंकित आर्यने कॉल करून 4 जणांचा डिनर तयार करण्यास सांगितले. रात्री 10.45 च्या सुमारास ते आले. मी त्यांना अंकिताचा डिनर तिच्या खोलीत घेऊन जाऊ का, असे विचारले. मी त्यांना माझा सर्व्हिस बॉय हे काम करेल, असे सांगितले. पण ते तयार झाले नाही. दुसऱ्या दिवशी समजले की, अंकिता खोलीतून गायब झाली आहे. तिची बॅग, पैसे व जेवण खोलीतच ठेवले आहे.

पुलकित आर्यला अंकिताच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पुलकितसह रिसॉर्टचे मॅनेजर सौरभ भास्कर व अंकित गुप्तालाही जेरबंद करमअयात आले आहे. संपूर्ण प्रकरणात हे तिघेच आरोपी आहेत.

अंकिताने ऑगस्टमध्येच रिसॉर्ट जॉइन केले होते

शिक्षणात हुशार असणाऱ्या अंकिताने 2020 मध्ये 88% गुणांसह 12 वीत टॉप केले होते. त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. मागील 28 ऑगस्ट रोजीच तिने ऋषिकेशच्या वनंतरा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम सुरू केले होते.

CM धामींचे गेस्ट हाऊसची चौकशी करण्याचे निर्देश, नैनितालमध्ये 5 रिसॉर्ट सील

अंकिता हत्याकांडानंतर राज्य सरकारने शनिवारी नैनितालच्या धनाचुली स्थित 5 रिसॉर्ट्स सील केले. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या क्षेत्रातील रिसॉर्ट व गेस्ट हाऊसची तपासणी करण्याचे निर्देश दिलेत. त्यानतंर अनेक होम स्टे व रिसॉर्टची चौकशी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी अंकिताच्या वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यात त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची ग्वाही दिली.

स्थानिकांनी भाजप आमदार रेणू बिष्ट यांच्या कारची अशी तोडफोड केली.
स्थानिकांनी भाजप आमदार रेणू बिष्ट यांच्या कारची अशी तोडफोड केली.
बातम्या आणखी आहेत...