आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकिता भंडारी हत्याकांड:सीबीआयमार्फत तपास करण्याची अंकिताच्या कुटुंबीयांची मागणी

डेहराडून8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमध्ये भाजप नेत्याच्या वनंतरा रिसॉर्टशी संबंधित अंकिता भंडारी हत्याकांडात मृताच्या आई-वडिलांनी मंगळवारी ऋषीकेशमध्ये धरणे दिले. या प्रकरणाचा सीबीआय मार्फत तपास करण्याची त्यांची मागणी आहे. अंकिताला न्याय मिळावा यासाठी युवा न्याय संघर्ष समितीकडून ४१ दिवसांपासून कोयल खोऱ्यात धरणे आंदोलन सुरू आहे. अंकिताचे वडिल विरेंद्र भंडारी सोमवारी आंदोलनस्थळी दाखल झाले होते. ते म्हणाले, एसआयटीच्या तपासावर विश्वास नाही. सीबीआयने याचा तपास करावा. परंतु त्यावर काहीही कार्यवाही होत नाही. घटनेच्या दहा दिवसांनंतर मुख्यमंत्री भेटीसाठी आले होते. आरोपींना शासन केले जाईल, असे आश्वासन दिले होते.

बातम्या आणखी आहेत...