आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजदीप सरदेसाई यांचा ग्राउंड रिपोर्ट:भारत जोडो यात्रेत घोषणा- सचिन पायलट यांना सीएम करा म्हणजे गटबाजी राहील

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी सध्या दौसा जिल्ह्यात आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्याजोगा आहे. यात्रेत एवढ्या मोठ्या संख्येत खासदार, मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधी आहेत की, क्वचित एखाद्या सभागृहातच पाहायला मिळतात.

स्वाभाविक आहे, कारण, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे समर्थक यात्रेतील घोषणेशिवाय सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करा,अशा घोषणा देत आहेत. दुसरीकडे, सर्व सामान्य लोक या क्षेत्रातील पाण्याशी संबंधित समस्या सांगू इच्छित होते. मात्र, अनेकांना त्यांना भेटण्याची संधी मिळाली नाही.

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न आहे की, यामुळे राजस्थानात पक्षाला काय फायदा होणार आहे? राहुल राज्यातून गेल्यानंतर गहलोत-पायलट यांच्यातील गटबाजी पुन्हा उफाळून येईल? दुसरीकडे, दोन्ही गटांत एकमेकांसोबत तात्पुरता करार झाला आहे की, जोवर राहुल राज्यात आहेत तोवर एकमेकांना काहीही बोलणार नाही. राजस्थान काँग्रेसमध्ये संघर्ष सत्तेचा आहे. मात्र, राहुल केवळ वैचारिक बोलतात.

यात्रेच्या पोस्टरवरून राष्ट्रीय अध्यक्ष खरगे गायब

- यात्रेच्या मार्गावर लावलेल्या बॅनर-पोस्टर्समध्ये एखाद्या ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे छायाचित्र दिसते.
- राहुल राजस्थान काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाशी संबंधित निर्णयात पडू इच्छित नसल्याचे दिसत आहे.

(राजदीप इंडिया टुडे टेलिव्हिजनचे अँकर व कन्सल्टिंग एडिटर आहेत.)

बातम्या आणखी आहेत...