आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Another 60 People, Including The Corporator's Husband, Were Arrested In The Bangalore Violence Case

बंगळुरू हिंसाचार:पोस्ट लिहिणाऱ्याचे शिर कलम केल्यास 51 लाखांचे बक्षीस, मेरठचे नेता शाहजेब रिझवी यांची घोषणा

बंगळुरूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगळुरू हिंसाचारप्रकरणी नगरसेवक पतीसह आणखी 60 जणांना झाली अटक

कर्नाटकच्या बंगळुरू हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी बृहन्बंगळुरू नगरपालिकेच्या नगरसेविका इरशाद बेगम यांचे पती कलीम पाशासह आणखी ६० जणांना अटक केली. याबरोबरच आता अटक झालेल्यांची एकूण संख्या २०६ झाली. हिंसाचारात एसडीपीआयच्या देखील ४ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष म्हणाले, काँग्रेसची नजर नगरपालिका निवडणुकीवर आहे. त्यामुळेच काँग्रेस हिंसाचाराबद्दल मूग गिळून आहेत. कलीम पाशा कर्नाटक काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती आहेत. राज्याचे गृहमंत्री बासवराज बोमई गुरुवारी म्हणाले, हिंसाचाराच्या प्रकरणात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा हात असल्याची माहिती मिळाली आहे.

काँग्रेस आमदार आर. अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे नातेवाईक पी. नवीन यांचा प्रक्षोभक संदेश सोशल मीडियावरून पोस्ट झाल्यानंतर मंगळवारी रात्री बंगळुरूच्या डी. जे. हल्ली व के. जी. हल्ली येथे हिंसाचार उसळला होता.

पोस्ट लिहिणाऱ्याचे शिर कलम केल्यास बक्षीस :

उत्तर प्रदेशातील मेरठचे नेता शाहजेब रिझवी यांनी फेसबुकवर वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओमध्ये रिझवी यांनी कर्नाटक हिंसाचार प्रकरणात काँग्रेस आमदारांचे नातेवाईक पी. नवीन यांचे शिर कलम करणाऱ्यास ५१ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

बातम्या आणखी आहेत...