आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपरफुटी प्रकरण:गुजरात पेपर लीक प्रकरणात आणखी एक आरोपी अटकेत

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात पंचायत कनिष्ठ लिपिक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी असरोजकुमार सीमांचल मालू या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. तो ओडिशाचा रहिवासी आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १७ आराेपींना अटक करण्यात आली आहे. गुजरात पंचायत सेवा निवड मंडळाची(जीपीएसएसबी) गेल्या रविवारी होणारी परीक्षा पेपर फुटल्यामुळे रद्द करण्यात आली होती. सोमवारी अटक करण्यात आलेला जीत नाईक हा हैदराबादचा रहिवासी असून तो प्रश्नपत्रिका छपाईचा इन्चार्ज होता,असे एटीएसने म्हटले आहे. रविवारी, परीक्षेच्या दिवशी गुजरात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स ताब्यात घेतली होती. यानंतर गुजरात पंचायत सेवा मंडळाने परीक्षा पुढे ढकल्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...