आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Another Ghulam Nabi Azad, Gehlot Praised By Modi, Rekindled Factionalism In The Rajasthan Congress

राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजी उफाळली:सचिन पायलट म्‍हणाले- मोदींनी कौतुक केलेले गहलोत हे दुसरे गुलाम नबी आझाद

जयपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस भलेही भारत जोडो यात्रा काढत असेल, पण राजस्थानात त्यांच्या घरचे भांडण थांबायचे नाव घेत नाही. पुन्हा मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद पेटला. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गहलोत यांचे कौतुक करणे वादाचे कारण ठरले.

मंगळवारी बांसवाडातील एका कार्यक्रमात मोदी म्हणाले होते, गहलोत आणि मी सीएम म्हणून सोबत काम केले. ते मंचावर बसलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात ज्येष्ठ आहेत. याच मंचावर गहलोत म्हणाले होते, पंतप्रधान जगामध्ये जिथे जातात तिथे त्यांचा सन्मान होतो. कारण ते गांधींच्या देशातील आहेत.

बुधवारी गहलोत यांचे नाव न घेता पायलट म्हणाले, पंतप्रधानांनी जे कौतुक केले तो मजेशीर घटनाक्रम आहे. यापूर्वी गुलाम नबी आझादांचेही कौतुक झाले होते. त्यानंतर जो निकाल आला तो सर्वांसमोर आहे. पायलट म्हणाले, राजस्थानात अलीकडच्या काळातील घडामोडीनंतर ३ लोकांना नोटीस बजावली होती. त्या लोकांनी उत्तर दिले आहे. पक्षामध्ये नियम-कायदे सर्वांसाठी समान आहेत. खरगे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे अनुशासनहीनता मानली पाहिजे आणि निर्णय होऊ नये असे होऊ शकत नाही.

अशी वक्तव्ये करणे टाळले पाहिजे : अशोक गहलोत पायलट यांच्या वक्तव्यानंतर गहलोत यांनी आक्रमक वक्तव्य केले नाही. ते म्हणाले, अशी वक्तव्ये करणे टाळले पाहिजे. राष्ट्रीय महामंत्री के. सी. वेणुगोपाल यांनी वक्तव्ये न करण्याचे निर्देश दिले. सध्या एकजूट होऊन काम करायचे आहे, जेणेकरून केंद्र सरकारवर दबाव राहील, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...