आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिखरजींसाठी उपोषण:दुसऱ्या जैन मुनींचा प्राणत्याग, जयपूरमध्ये मुनी समर्थ सागर (74) यांचे निधन

जयपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडमधील जैन तीर्थस्थळ सम्मेद शिखरचे पावित्र्य राखण्यासाठी आणखी एका जैन मुनीने प्राणत्याग केला आहे. गुरुवारी रात्री १.२० वाजता मुनी समर्थसागर (७४) यांचे निधन झाले. चार दिवसांत देह त्यागणारे हे दुसरे मुनी आहेत.

शुक्रवारी सकाळी त्यांनी प्राणत्याग केल्याची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने जैन समुदायाचे लोक मंदिरात पोहोचले. मुनींची डोल यात्रा संघीजी मंदिरातून विद्याधरनगरपर्यंत काढण्यात आली.

या वेळी संत शशांकसागर म्हणाले, जोपर्यंत झारखंड सरकार सम्मेद शिखरला तीर्थस्थळ घोषित करत नाही तोपर्यंत मुनी असे बलिदान देत राहतील. जयपूरच्या सांगानेर येथील संघीजी दिगंबर जैन मंदिरात समर्थसागरजी गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. मंदिराचे आचार्य सुनीलसागर महाराज यांच्या उपस्थितीत मुनी समर्थसागर यांना समाधी देण्यात आली. मंगळवारी सुज्ञेयसागर महाराजांनी प्राणत्याग केला होता.

बातम्या आणखी आहेत...