आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सीमा सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर भागात एका भुयाराचा पर्दाफाश केला. हे भुयार सुमारे १५० मीटर लांब व ३० फूट खोल आहे. त्याची रुंदी सुमारे तीन फूट आहे. बीएसएफच्या प्रवक्त्याने शनिवारी ही माहिती दिली. भारतीय सीमेत घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने हे भुयार तयार केले होते. हिरानगर भागात १० दिवसांत हा दुसरा व सांभा तसेच कठुआ जिल्ह्यालगत आंतरराष्ट्रीय सीमेवर गेल्या सहा महिन्यांत आढळून आलेला हे चौथे भुयार आहे.
हिरानगर भागात बोबियान गावात १३ जानेवारीला १५० मीटर लांबीचे हे भुयार उघड करण्यात आला होते. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी बीएसएफने अत्याधुनिक उपकरण असलेले सुरक्षा ग्रिड तयार केले. या भागातील दहशतवाद्यांचे मनसुबे सातत्याने अयशस्वी होत आहेत. कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टिमच्या साह्याने दहशतवाद्यांचे इरादे हाणून पाडले जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.