आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Another Target Killing In Kashmir, Rajasthan Bank Manager Shot Dead In Kulgam By Terrorist

टार्गेट किलिंगने पुन्हा हादरले काश्मीर:कुलगाममध्ये राजस्थानच्या बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या

कुलगामएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना समोर आली आहे. यावेळी दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरला लक्ष्य करून त्यांची हत्या केली आहे.

विजय कुमार असे मृत बँक व्यवस्थापकाचे नाव असून ते मूळ राजस्थानचे रहिवासी आहेत. यापूर्वी सांबा येथे राहणाऱ्या रजनी बाला या शिक्षिकेची हत्या करण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांतील टार्गेट किलिंगची ही दुसरी घटना आहे.

या वर्षातील सुरुवातीच्या पाच महिन्यांत मे महिना जम्मू-काश्मीरसाठी सर्वात हिंसक ठरला. या दरम्यान 10 नागरिकांचे प्राण गेले. दुसरीकडे, खोऱ्यात झालेल्या 17 चकमकींत 27 अतिरेकी मारले गेले. सर्वाधिक फटका दक्षिण काश्मीरला बसला. तेथे 10 चकमकी झाल्या. उत्तर काश्मिरात 6 आणि मध्य काश्मीरमध्ये एक चकमक झाली.

31 दिवसांत 2 महिलांसह 7 जणांची हत्या

दहशतवाद्यांकडून गेल्या 31 दिवसांत दोन महिलांसह 7 नागरिकांना ठार करण्यात आले. यात 3 हिंदू आणि 4 मुस्लिम होते. चकमकीत अडकून तीन नागरिकांनी जीव गमावला. एप्रिलमध्ये 33, मार्चमध्ये 24, फेब्रुवारीत 14 आणि जानेवारीत 24 नागरिकांचे प्राण गेले. या 5 महिन्यांत 134 लोकांचे प्राण गेले. त्यात 97 अतिरेकी, 18 सुरक्षा रक्षक आणि 19 नागरिक आहेत. सर्वाधिक हत्या काश्मिरात झाल्या.

या वर्षी 97 अतिरेकी ठार

या वर्षी आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 97 अतिरेकी मारले गेले. यामध्ये 5 जम्मू विभाग आणि 92 काश्मीर विभागात मारले गेले. आतापर्यंत ज्या अतिरेक्यांची ओळख पटली आहे, त्यात 26 बाहेरचे आणि 65 स्थानिक होते. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित 53 होते. 24 जैश, 11 हिज्बुल आणि दोन अल-बद्र संघटनेशी संघटनेशी संबंधित होते.

बातम्या आणखी आहेत...