आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेलकाता:पश्चिम बंगालमध्ये आणखी एका तृणमूल कार्यकर्त्याची हत्या, राज्याच्या पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील घटना

काेलकाता9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूलच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. मृत कार्यकर्त्याचे नाव धरमवीर नुनिया असे सांगण्यात आले आहे. ही घटना पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील अंडल भागात घडली. या हल्ल्यात दाेन सहकारीदेखील जखमी झाले.

पाेलिसांच्या म्हणण्यानुसार अज्ञात हल्लेखाेरांनी हा हल्ला केला. त्यांचा तपास सुरू आहे. एक स्थानिक तृणमूल नेता म्हणाला, हत्येमागे राजकीय कारण नाही. हल्लेखाेरांना कडक शिक्षा झाली पाहिजे.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आपल्या भाषणातून बंगालमधील राजकीय हिंसाचारावर चिंता व्यक्त केली हाेती. निवडणूक येते, जाते. परंतु मृत्यूचा खेळ करून कुणाला मत मिळणार नाही, असे त्यांनी म्हटले हाेते.

काळे झेंडे दाखवले : भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगालच्या शाखेचे अध्यक्ष दिलीप घाेष यांना अलिरपुरदुआर जिल्ह्याच्या जैगाव भागात काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यांच्या वाहनावर दगडफेकही झाली. गाेरखा जनमुक्ती माेर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रवेश करण्यास मज्जाव केला. घाेषणाबाजीही करण्यात आली. या घटनेवर तृणमूलच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष साैरव चक्रवर्ती म्हणाले, दिलीप घाेष बंगालमध्ये अडचण िनर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...