आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Weather Update : Cold Wave Will Last Two Weeks In The Plains; Severe Winter In Punjab, Haryana, Rajasthan, Delhi And UP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:पर्वतांवर होणाऱ्या हिमवर्षावामुळे थंडीचा आणखी दोन आठवडे मुक्काम; 14 वर्षांत प्रथमच जानेवारीत सिमल्यात बर्फवृष्टी नाही

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगरमध्ये जलवाहिनीत थंडीमुळे गोठलेले पाणी असे गरम करून वापरात आणले जाते. - Divya Marathi
श्रीनगरमध्ये जलवाहिनीत थंडीमुळे गोठलेले पाणी असे गरम करून वापरात आणले जाते.
  • जानेवारीतील तिसरा पश्चिमी विक्षोभ आज डोंगररांगांत धडकण्याचा अंदाज
  • हवामानाने कूस बदलली : उत्तर भारतात तापमानात 2-4 अंश घट

पर्वतांवर आणखी हिमवर्षाव होणार असल्याने देशातील मैदानी प्रदेशात पुढील दोन आठवडे थंडी राहील. जम्मू-काश्मीरमध्ये या महिन्यातील तिसरे विक्षोभ (पश्चिम देशांकडून येणाऱ्या हवेचा दाब) रविवारी सायंकाळपर्यंत येईल आणि ३ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण हिमालय परिसरातील राज्यांतील उंच भागात अनेक ठिकाणी हलका व मध्यम पाऊस तसेच हिमवर्षाव होईल.

सामान्यत: डोंगरावर पश्चिमी विक्षोभ येताच उत्तरेकडील मैदानी राज्यातील वारा बदलतो व थंडी काहीशी कमी होते. मात्र, या वेळी ते कमकुवत असल्याने पुढील तीन ते चार दिवस मैदानी राज्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, यूपी, मप्र, छत्तीसगड, बिहार व गुजरातमध्ये थंडी कायम राहील. पुढील तीन दिवस पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, यूपी, बिहार व पश्चिम बंगालमध्ये दाट धुकेही राहील. पूर्व यूपी, बिहार व मप्रमध्ये थंडी राहील. उत्तराखंडातील गढवाल व कुमाऊच्या डोंगरांवरही हिमवर्षाव होईल. संपूर्ण उत्तर भारतात पुढील दोन आठवडे किमान तापमान २ ते १० अंशांदरम्यान असेल, जे सामान्यपेक्षा २ ते ४ अंश सेल्सियस कमी असेल.

२०२१ मध्ये जानेवारी महिन्यात आतापर्यंत ७ थंड दिवस होते. त्या काळात किमान तापमान ४ अंश किंवा त्यापेक्षा कमी नोंद झाले. याआधी २०१३ मध्ये ६ थंड दिवस नोंद झाले होते आणि जानेवारीत सर्वाधिक ९ थंड दिवस २००८ मध्ये नोंदवले गेले होते.

सिमलाच्या सखल भागांत हिमवृष्टीची शक्यता नाही

इकडे १४ वर्षांनंतर पहिल्यांदाच जानेवारीत सिमल्याच्या डोंगरांवर हिमवर्षाव झाला नाही. हवामान केंद्राचे संचालक मनमोहनसिंह यांनी सांगितले, पुढील आठवड्यापर्यंत पाऊस व हिमवर्षावाची शक्यता नाही. मात्र, हिमाचलच्या काल्पा या उंच भागात या महिन्यात सुमारे साडेतीन फूट तर केलांगमध्ये २ फूट हिमवर्षाव झाला. डिसेंबरमध्ये सिमल्यात दोनदा हिमवर्षाव झाला. जानेवारीत ज्या ज्या वेळी पश्चिम विक्षोभ आला त्याचा परिणाम उंच भागातच झाला, मात्र तो सखल भागांत पोहोचला नाही.