आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anti Covid Drug 2DG Launched | Anti Covid Drug 2DG Launched In India, Coronavirus Surge In India, Coronavirus Surge, Defence Minister Rajnath Singh, Health Minister Harsh Vardhan

कोरोनाचे स्वदेशी औषध:DRDO ने तयार केलेले अँटी कोविड ड्रग 2DG लॉन्च, पावडर स्वरूपातील हे औषध पाण्यातून घेता येईल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • DRDO ने डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीजसोबत मिळून औषध तयार केले आहे

डीआरडीओचे कोरोनारोधी औषध 2-DG सोमवारी आपातकालीन वापरासाठी रिलीज करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. आता हे औषध रुग्णांना दिले जाऊ शकते. हे औषध पावडरच्या स्वरूपात आहे. हे औषध सर्वात पहिले दिल्लीतील DRDO कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना दिले जाईल.

DRDO ने डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीजसोबत मिळून औषध तयार केले आहे
हे औषध DRDO च्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड साइंसेस (INMAS) ने डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीजसोबत मिळून तयार केले आहे. क्लीनिकल रिसर्चदरम्यान 2-डीजी औषधाच्या 5.85 ग्रामचे पाउच तयार करण्यात आले. याचे एक-एक पाउच सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात मिसळून दिले जातात. याचे चांगली परिणाम दिसून आले आहेत. ज्या रुग्णांना हे औषध दिले, त्यांच्यात वेगाने रिकव्हरी होत आहे. या आधारावर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाला परवानगी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...