आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Anti Covid Drug Will Be Made In The Country On The Lines Of Anti Venom, Trials On Three Thousand Horses Are Successful, Trials Will Be Done On Humans Soon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सक्लुसिव्ह:अँटी व्हेनमच्या धर्तीवर देशात तयार होईल अँटी कोविड ड्रग; मानवी चाचणी लवकरच सुरू होणार

हैदराबाद(प्रमोद त्रिवेदी)23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 3000 घोड्यांवर यशस्वी चाचणी करण्यात आली

सध्या देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. शेकडो-हजारोंच्या संख्येने मृत्यू होत आहेत. यातच आता एक चांगली बातमी मिळाली आहे. विषबाधेचा परिणाम कमी करण्याच्या तंत्रज्ञानावर आधारीत कोरोना व्हायरसच्या औषधासाठी लवकरच मानवी चाचण्या सुरू होणार आहेत. देशातील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी (CCMB) ने विषाचे औषध तयार करणारी कंपनी विन्स बायोटेकसोबत मिळून कोरोनाचे औषध तयार केले आहे. या औषधाच्या घोड्यावरील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

CCMB चे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी सांगितले की, त्यांनी जीनोम सिक्वेंसिंग लॅबमध्ये कोरोना व्हायरस तयार करुन त्याचे कल्चर केले आहे. व्हायरस कल्चर केल्यानंतर त्या व्हायरसला मारले जाते. या मृत विषाणूंना घोड्यामध्ये इंजेक्ट केले जाते. यानंतर 15 ते 25 दिवसांमध्ये घोड्यांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचे आढळून आले. विन्स बायोटेकसोबत मिळून तीन हजार घोड्यांवर यशस्वी चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यानंतर विन्सने DGCI (ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया) कडे मानवी चाचण्यांसाठी परवानगी मागितली आहे. येत्या काही दिवसात ड्रग कंट्रोल जनरलकडून परवानगी मिळू शकते.

डॉ. मिश्रा आणि सायटिस्ट प्रो. पूरनसिंह सिजवाली सांगतात की, हा प्रयोग विषाला मारणाऱ्या म्हणजेच, अँटी वेनम त्रज्ञावर आधारित आहे. यात खूप कमी प्रमाणात घोड्याच्या शरीरात कोब्रा सापाचे विष टाकले जाते. या विषाविरोधात घोड्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात. अँटीबॉडी तयार झाल्यानंतर घोड्याचे रक्त काढून शूद्ध केले जाते. यानंतर ही अँटीबॉडी साप चावलेल्या व्यक्तीला दिली जाते.

एका घोड्याच्या रक्तातून हजारो लोकांसाठी औषध तयार केले जाऊ शकते

शास्त्रज्ञांनी सांगितले की, मानवाच्या शरीरातही इनअॅक्टिव्ह व्हायरसला इंजेक्ट करु अँटीबॉडी तयार करता येते. पण, मानाच्या शरीरातून जास्त रक्त काढले जाऊ शकत नाही. पण, घोड्याच्या रक्तातून हजारो लोकांना वाचवता येईल, इतके रक्त काढता येते.

बातम्या आणखी आहेत...