आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Antilia Case Updates: Bribe Taken By CBI Officer For Clean Chit; News And Live Updates

अनिल देशमुख प्रकरणात कलाटणी:क्लीन चिटसाठी सीबीआय अधिकाऱ्याने घेतली लाच; वकील, जावयाची चौकशी; उपनिरीक्षकाला अटक

नवी दिल्ली/ मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संशयास्पद क्लीन चिट

माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीस बुधवारी नाट्यमय कलाटणी मिळाली. देशमुख प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी सीबीआयच्या एका फौजदारानेच लाच घेतल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणात देशमुखांचा वकील अानंद डागा आणि अन्य एकाविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयचा लाचखोर फौजदार अभिषेक तिवारी, नागपूरस्थित वकील डागा आणि अन्य एका जणाविरोधात सीबीआयने कारवाई केली. वकिलाची कसून चौकशी करण्यात आली तसेच दिल्ली आणि अलाहाबाद येथे छापेमारीही करण्यात आली,

संशयास्पद क्लीन चिट
सीबीआयच्या प्राथमिक चाैकशीत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिल्याचे वृत्त शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हा अहवाल फुटला कसा याची सीबीआयने चाैकशी सुरू केली असता देशमुख यांच्या ताफ्यातील लोकांनी फौजदार तिवारीला लाच दिल्याचे उघडकीस आले. या प्रकरणातच जावई चतुर्वेदी आणि वकील डागाचीही चाैकशी करण्यात आली. त्यानंतर डागाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे देशमुख आणखीच अडचणीत आले आहेत.

मुंबईतील अपहरणनाट्य
वरळीतील अपहरण नाट्य देशमुखांचे वरळी येथील निवासस्थान असलेल्या शुभदा इमारतीत रात्री आठ वाजता दहा ते बारा अज्ञात लोकांनी गौरव चतुर्वेदी आणि त्यांचे वकील डागा यांना ताब्यात घेतले. मात्र या दोघांचे अपहरण झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केला. तसेच अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यासाठी देशमुख कुटुंबीय वरळी पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. मात्र चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले. सुमारे ३० मिनिटांच्या चौकशीनंतर चतुर्वेदी यांना सोडून देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...