आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:मासे विक्रेता ते 20 हजार कोटींचा कोळसा तस्कर अनुप मांझी ऊर्फ लाला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ममता बॅनर्जींच्या भाच्याला अडचणीत आणणारा फरार तस्कर अनुप मांझी

विकास सिंह | धनबाद, ललित दुबे, त्रिलोचन सिंह | पुरुलिया, एम. रियाज हाशमी |
झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांत ५५०० कोटींचा कोळसा घोटाळा...! कोळशाच्या काळ्या कमाईच्या या साम्राज्याचा मालक म्हणजे अनुप मांझी ऊर्फ लाला आता संपूर्ण देशात चर्चेत आला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे हा घोटाळा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे, अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा यांच्यापर्यंत पोहोचला आहे. ऐन निवडणुकीत सीबीआयच्या चौकशीत घोटाळा उघडकीस आल्यानंतर आणि लाला फरार झाल्यानंतर भास्करची टीम त्याच्या गावी पोहोचली. बंगालमधील पुरुलियाच्या भामुरिया गाव कधी लालाला मासे विकणारा म्हणून ओळखत असे. १५ वर्षांपूर्वी लाला गावात सायकलवरून मासे विकायचा; परंतु आज तो २० हजार कोटींच्या संपत्तीचा मालकच नाही तर त्याचे गावही बदलले आहे. प्रत्येक चौक, घरावरील सीसीटीव्ही सांगतात की इथे बाहेरील लोकांचे स्वागत होत नाही.

गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात सीसीटीव्ही...लालाची झोपडी आजही आहे, तिच्या बाजूला बांधला आलिशान बंगला
भामुरिया गाव प. बंगालच्या पुरुलियापासून ६५ किमी दूर आहे. प्रवेशावर स्वामी विवेकानंदांचा पुतळा. पीसीसीचे मजबूत रस्ते. चमकदार पथदिवे आणि अनेक दोन मजली घरे गावाची भरभराट दर्शवतात. गावाच्या कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे. २० वर्षांपूर्वी दुर्गापूजेचे मुख्य ठिकाण असलेले हे गाव आज कोळशाच्या अवैध उत्खननासाठी कुख्यात आहे.

संध्याकाळी ७ वाजता आम्ही गावात पोहोचलो. लोक घरातून आमच्या गाड्या पाहत राहिले. आम्ही दोन तरुणांना विचारले- अनुप मांझी तुम्हाला माहीत आहे का? दोघेही बंगालीमध्ये एकत्र बोलले - किछो जानी ना. (काहीही माहीत नाही) आम्ही पुढे लोकांना विचारतच राहिलाे, प्रत्येकाने आम्हाला टाळले. वयोवृद्धाने सांगितले चासपाड्याला जा. आम्ही चासपाडा मोहल्ल्यात पोहोचलो. तेथे लालाचे वडिलोपार्जित घर सापडलेे. जवळपास दीड हजार चौरस फुटात मातीच्या भिंती आणि तुटलेले छप्पर असलेले जुने घर. आता नवीन कुंपणाने वेढलेले आहे. या घराशेजारी नारिंगी रंगाचा एक मोठा बंगला आहे. मोठे दरवाजे, उंच भिंती, बरेच सीसीटीव्ही. घराचा फोटो घेताच बरेच लोक जमले. आपले नाव काय आहे? आपण कोठून आला आणि येथे काम काय आहे ... असे बरेच प्रश्न. आम्ही सांगितले- वृत्तपत्रातून आलो, वार्तांकन करायचे आहे.

७० मालमत्ता जप्त : लालाच्या सुमारे २० हजार कोटींच्या संपत्तीची माहिती मिळाली आहे. सीबीआयने न्यायालयात १० हजार कोटींच्या ७० मालमत्तांचा तपशील दिला आहे. त्याचे भामुरिया गावात, रिसॉर्ट, कोलकात्यामधील हॉटेल-फ्लॅट, दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू येथे मॉल आणि भूखंड आहेत. लालाचे परिवहन व्यवस्थापक राकेश वर्माची मालमत्ताही जप्त केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...