आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचित्रपट अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी दिल्लीत एनसीआरमध्ये होते. ते आपल्या मित्राला भेटण्यासाठी येथे आले होते. बुधवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते आपल्या ड्रायव्हरला मला रुग्णालयात घेऊन चल असे म्हणाले. पण रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. सतीश कौशिक यांचे जिवलग मित्र अनुपम खेर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
सतीश कौशिक यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये दुःखाची लाट पसरली. अनुपम खेर यांनी एका ट्विटद्वारे त्यांच्या निधनाची बातमी शेअर केली. त्यांनी सांगितले की, सतीश कौशिक आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी दिल्लीत होते. त्यांना मृत्यूपूर्वी काही तास अगोदर घाबरल्यासारखे वाटत होते.
ड्रायव्हरला म्हणाले - मला रुग्णालयात घेऊन चल
सतीश कौशिक त्यावेळी दिल्लीतील आपल्या एका मित्राच्या घरी होते. त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांनी तसे बोलूनही दाखवले होते. अनुपम खेर म्हणाले - त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या ड्रायव्हरला मला रुग्णालयात घेऊन चल असे सांगितले. पण रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यावेळी मध्यरात्रीचे 1 वाजत होते.
ANI च्या वृत्तानुसार, सतीश कौशिक यांचे शवविच्छेदन दिल्लीच्या दीन दयाल रुग्णालयात होईल. यासाठी त्यांचा मृतदेह पहाटे 5.30 च्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आला. तो तिथे मॉर्चरीमध्ये ठेवण्यात आला. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला.
अवघ्या 80 रुपयांसाठी सतीश कौशिक काठी घेऊन अनुपम खेर यांना मारण्यासाठी निघाले
सतीश कौशिक व अनुपम खेर जिवलग मित्र होते. या दोघांच्या अभिनयाची सुरुवातही एकत्रच झाली होती. त्यावेळी अनुपम खेर यांचा खिसारा नेहमीच रिकामा राहत होता. यामुळे त्यांनी सतीश कौशिक यांना 80 रुपये मागितले होते. पण खेर यांनी वारंवार मागूनही त्यांनी ते परत केले नव्हते. त्यामुळे सतीश कौशिक हातात काठी घेऊन त्यांना मारण्यासाठी गेले होते. ते म्हणाले माझे पैसे परत कर, नाहीतर मी तुला तोडून-फोडून टाकीन.
20 रुपये अनुपम खेर यांच्याकडे शिल्लक
त्यानंतर अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांना 80 पैकी 60 रुपये परत केले. त्यातील 20 रुपये खेर यांनी अजून परत केले नाही. सतीश कौशिक यांना आपले 20 रुपये परत मिळाले नाही. पण खेर यांच्या रुपाने त्यांना पुढील आयुष्यभर एक चांगला मित्र मिळाला.
सतीश कौशिक यांच्या निधनासंबधीच्या खालील बातम्या वाचा...
दररोज मॉर्निंग वॉकला जायचे सतीश कौशिक:मित्र म्हणाले- ते फिटनेस फोकस्ड होते, सलमानचा बॉडीगार्ड शेराच्या मुलाला लाँच करणार होते
सतीश कौशिक यांनी कागज-2 चे शूटिंग पूर्ण केले होते. यात दर्शन कुमार, अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यावेळी पंकज त्रिपाठी त्यांच्यासोबत नव्हते. यापूर्वीच्या भागात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत होते. याशिवाय सतीश कौशिक कागज-3 चीही घोषणा करणार होते. यासोबतच आणखी 2 चित्रपट दिग्दर्शिक करणार होते. ते त्यांचं शूटिंग सुरू करणार होते. सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या मुलालाही ते लॉन्च करणार होते. येथे वाचा सविस्तर वृत्त
सतीश कौशिक यांचे 66 व्या वर्षी निधन:कौटुंबिक कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले होते; रात्री प्रकृती बिघडली, रुग्णालयात मध्यरात्री 1.30 वा. मृत्यू
66 वर्षीय अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे बुधवारी मध्यरात्री दिल्लीत हार्ट अटॅकमुळे निधन झाले. ते 8 मार्च रोजी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले होते. तिथे रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण मध्यरात्री 1.30 वा. त्यांची प्राणज्योत मालवली. येथे वाचा संपूर्ण बातमी...
कौशिक यांचा पहिलाच चित्रपट ठरला फ्लॉप:1993 मध्ये सर्वाधिक बजेटच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, मुलाच्या मृत्यूने कोलमडले
प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक सतिश कौशिक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 13 एप्रिल 1967 रोजी महेंद्रगड, हरियाणात जन्मलेल्या सतिश यांचा चित्रपट प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. एनएसडी (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) आणि एफटीआयआय (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) मधून शिक्षण घेतलेल्या सतिश यांना कारकिर्दीत खूप संघर्ष करावा लागला. 1980 च्या सुमारास चित्रपटांतील त्यांचा संघर्ष सुरू झाला. 1987 मध्ये मिस्टर इंडिया चित्रपटातून कॅलेंडरच्या भूमिकेतून ओळख मिळाली. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.