आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anurag Thakur | Anurag Thakur Launch Fit India Freedom Run As Part Of (Independence Day) Azadi Ka Amrit Mahotsav; News And Live Updates

फिट इंडिया फ्रीडम रन 2.0:केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला ग्रीन सिग्नल; देशाला निरोगी ठेवण्यासाठी 7.5 कोटी लोक होणार सहभागी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फिटनेसचा डोस, अर्धा तास दररोज मोहीम

देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत 'फिट इंडिया फ्रीडम रन 2.0' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. दरम्यान, आज देशातील विविध ऐतिहासिक ठिकाणी 75 शारीरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 13 ऑगस्ट रोजी सुरू झालेला हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री निसीथ प्रमाणिक यांनीदेखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. दरम्यान, सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन एक जनचळवळ बनवण्याचे आवाहन केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले की, जेव्हा आपण स्वातंत्र्याची 75 वी जयंती साजरी करत आहोत, तेव्हा आपण निरोगी भारताची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. कारण हा एक मजबूत भारत बनवण्यासाठी गरजेचे आहे.

फिटनेसचा डोस, अर्धा तास दररोज मोहीम
ठाकूर म्हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 'फिटनेसचा डोस, अर्धा तास दररोज' मध्ये सामील होतील. आपल्याला ही चळवळ मोठी करायची आहे. त्यासाठी तुम्ही गट, स्थान, वेळ निवडा पण निश्चितच फिट इंडिया फ्रीडम रनमध्ये सामील व्हा. यामुळे देश आणि आपले कुटुंब निरोगी ठेवण्यास मदत होणार आहे.

फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 या कार्यक्रमाला अनुराग ठाकूर यांनी ग्रीन सिग्नल दिला.
फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 या कार्यक्रमाला अनुराग ठाकूर यांनी ग्रीन सिग्नल दिला.
अनुराग ठाकूर म्हणाले की, गेल्या वेळी 5 कोटी लोक सामील झाले होते आणि यावेळी 7.5 कोटी लोक थेट यामध्ये सामील होतील.
अनुराग ठाकूर म्हणाले की, गेल्या वेळी 5 कोटी लोक सामील झाले होते आणि यावेळी 7.5 कोटी लोक थेट यामध्ये सामील होतील.
अनुराग ठाकूर यांनी लोकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
अनुराग ठाकूर यांनी लोकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
अटारी-वाघा बॉर्डरवरुन बीएसएफच्या जवानांनी या शर्यतीत भाग घेतला.
अटारी-वाघा बॉर्डरवरुन बीएसएफच्या जवानांनी या शर्यतीत भाग घेतला.
बातम्या आणखी आहेत...