आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aparna Purohit Bail Update | Amazon Prime Video India Head Aparna Purohit Case Update On Web Series Tandav

सुप्रीम कोर्टाने सुनावले:तांडव वाद प्रकरणी अ‍ॅमेझॉनच्या इंडिया हेडला अटक करू नका, केंद्र सरकारने OTT प्लॅटफॉर्मसाठी जारी गेलेल्या गाइडलाइनमध्येच दम नाही

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • OTT प्लॅटफॉर्म नियंत्रित करण्यासाठी गाइडलाइनपेक्षा कायदा करायला हवा -कोर्ट

सुप्रीम कोर्टाने वेब सिरीज 'तांडव' वाद प्रकरणी अ‍ॅमेझॉनच्या भारत प्रमुख अपर्णा पुरोहित यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. अर्थातच तूर्तास पोलिस त्यांना अटक करू शकणार नाहीत. तरीही सुरू असलेल्या तपासात अपर्णा यांनी तपास संस्थांना सहकार्य करावे असे निर्देश कोर्टाने दिले शुक्रवारी आहेत.

तांडवमध्ये वादग्रस्त दृश्यांवरून लखनौमध्ये FIR दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये अपर्णा यांचेही नाव आहे. त्याविरोधात अपर्णा यांनी अलाहाबाद हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्झ केला होता. हायकोर्टाने तो अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. सोबतच, उत्तर प्रदेश सरकारकडून उत्तर मागितले आहे.

केंद्राच्या गाइडलाइनमध्ये दम नाही, कायदा करा
सुप्रीम कोर्टाने ओव्हर द टॉप अर्थात OTT प्लॅटफॉर्म्सवर नजर ठेवण्यासाठी केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या गाइडलाइनवरून केंद्राचाच समाचार घेतला. केंद्राच्या या गाइडलाइनमध्ये दम नाही. त्यामध्ये खटला दाखल करण्याचा उल्लेख नाही. OTT प्लॅटफॉर्म्स नियंत्रित करण्यासाठी निती-निर्देशक तत्वे नाही तर कायदाच करायला हवा असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ते तुषार मेहता यांनी योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले. तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर कुठल्याही प्रकारच्या नियमांची कोर्टाला माहिती दिली जाईल असेही सांगितले.

कोर्टानेच मागितल्या होत्या गाइडलाइन
तांडव प्रकरणात सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटवर भाष्य केले होते. कोर्टाने गुरुवारी झालेल्या सुनावणीत म्हटले होते, की OTT प्लॅटफॉर्म्सवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटची आधी स्क्रीनिंग व्हायला हवी. कारण, या प्लॅटफॉर्ममध्ये पोर्नोग्राफी सुद्धा दाखवली जात आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सोशल मीडिया आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नियंत्रित करण्यासाठी बनवलेल्या नव्या गाइडलाइन सोपवण्याचेही निर्देश दिले होते.

जानेवारी रिलीज झाली होती सिरीज
सैफ अली खान, मोहंमद जीशान अय्युब आणि डिंपल कपाडिया स्टारर तांडव वेब सिरीज अ‍ॅमेझॉनवर जानेवारीत रिलीज झाली होती. या सिरीजच्या अनेक दृश्यांवर आक्षेप घेण्यात आले. सिरीजच्या पहिल्या सीनमध्येच धार्मिक भावना दुखावल्याचे आणि त्यानंतर पोलिस आणि पंतप्रधानांच्या पदांचा अपमान केल्याचे आरोप लागले.

बातम्या आणखी आहेत...