आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन हायकोर्टांत 11 अतिरिक्त न्यायमूर्तींची नियुक्ती:एलसीव्ही गौरींना मद्रास हायकोर्टात जज नियुक्तीविरोधात सुनावणी आज

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इस्लामला हिरवा तर ख्रिश्चनला पांढरा दहशतवाद संबोधले होते

इस्लामला हिरवा दहशतवाद व ख्रिश्चनला पांढरा दहशतवाद संबोधून वादात अडकलेल्या वकील लक्ष्मण चंद्रा व्हिक्टोरिया गौरींना मद्रास हायकोर्टात न्यायमूर्ती करण्यास विरोध सुरू झाला आहे. त्यांच्या नियुक्तीविरोधात हायकोर्टातील काही वकिलांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणीसाठी तयारी दर्शवली.

यादरम्यान केंद्राने तीन हायकोर्टात गौरींसह १३ न्यायमूर्तींच्या नियुक्तीस मंजुरी दिली. सर्वोच्च न्यायालय न्यायवृंदची(कॉलेजियम) गौरी यांच्या नावाची शिफारस सरकारला पाठवण्यासोबत हायकोर्टाच्या २२ वकिलांनी कॉलेजियम व राष्ट्रपतींना पत्र लिहून सांगितले होते की, गौरी भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस आहेत. त्यांना न्यायमूर्ती केल्यास न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर परिणाम होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...