आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Appointment Of Lawyers, Consumer Professionals To Consumer Commission Is Possible

नियुक्ती:वकील, ग्राहक व्यावसायिकांची ग्राहक आयोगात नियुक्ती शक्य

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्राहक आयोगातील रिक्त अध्यक्ष आणि सदस्यांच्या पदांवर व्यावसायिक लोक व वकिलांची नियुक्ती केली जाऊ शकते,असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यासाठी त्यांना एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आणि त्यांना कायदा, ग्राहक प्रकरणे आणि सामाजिक प्रकरणांत १० वर्षांचा अनुभव असला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एम.आर. शहा आणि एम.एम. सुंदरेश यांच्या पीठाने या निर्णयासोबत केंद्राला निर्देश दिले की, त्यांनी ग्राहक आयोगातील सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात जुन्या नियमांत दुरुस्ती करावी.

दोन परीक्षांच्या आधारावर नियुक्ती ही नियुक्ती २ परीक्षांच्या आधारावर होईल. एक ५० गुणांची लेखी परीक्षा असेल आणि दुसरी ५० गुंणांची तोंडी परीक्षा असेल. ही व्यवस्था ग्राहक संरक्षण नियमांत दुरुस्ती होईपर्यंत लागू राहील.

बातम्या आणखी आहेत...