आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Approval Of Another Drug For Corona, DRDO Medicine Will Reduce The Need For Oxygen

नवी दिल्ली:कोरोनासाठी आणखी एका औषधाला मंजुरी, DRDO च्या मेडिसिनने कमी होईल ऑक्सिजनची गरज

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये शनिवारी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) कोरोनाच्या उपचारांसाठी एका औषधाच्या आपतकालीन वापरास मान्यता दिली आहे. हे औषध डीआरडीओच्या न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) या दोघांनी मिळून तयार केले आहे. या औषधाला 2-deoxy-D-glucose (2-DG) नाव देण्यात आले आहे. हैदराबाद येथील डॉ रेड्डी लॅबमध्ये हे औषध बनवले जाईल.

औषधाच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. असा दावा केला जात आहे की ज्या रुग्णांवर या औषधाचे ट्रायल करण्यात आले त्यांच्यामध्ये लवकर रिकव्हरी दिसून आली. यासोबतच रुग्णांना ऑक्सिजनवरील निर्भरता देखील कमी झाली. औषध वापरल्यामुळे रुग्णांचा कोरोना रिपोर्ट इतर रुग्णाच्या तुलनेत लवकर निगेटिव्ह येत आहे. रुग्ण लवकर बरेही होत आहेत.

डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी एप्रिल 2020 मध्ये या औषधावर एक्सपेरिमेंट केले होते. यामध्ये असे आढळून आले की, हे औषध कोरोना विषाणूपासून बचाव करण्यात मदत करते. त्यानंतर डीसीजीआयने मे 2020 मध्ये फेज -2 ट्रायल घेण्यास मान्यता दिली होती.

बातम्या आणखी आहेत...