आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Approval Of Covaxin covishield Mixed Test; India Discusses Purchase Of 5 Crore Doses From Pfizer; News And Live Updates

लसीकरण:कोव्हॅक्सिन-कोविशील्डच्या मिश्र चाचणीला मंजुरी; फायझरकडून 5 कोटी डोस खरेदीसाठी भारताची चर्चा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरणाला गती देण्यासाठी भारत फायझरची लस घेण्याबाबत चर्चा करत आहे. सूत्रांनुसार, भारत फायझरशी लसीचे पाच कोटी डोस खरेदी करण्याबाबत चर्चा करत आहे. तथापि, भारत सरकार आणि फायझर यांच्यातर्फे अद्याप याबाबत अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाही.

आणखी एका वृत्तानुसार, भारताचे आरोग्य मंत्रालयही जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस लस खरेदी करण्याबाबत विचार करत असून त्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. अलीकडेच या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली होती.

फायझरकडून 5 कोटी डोस खरेदीसाठी भारताची चर्चा
भारताच्या औषधी महानियंत्रकांनी (डीसीजीआय) कोरोना विषाणूच्या विरोधात कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन प्रमुख लसींच्या मिश्रणाच्या अभ्यासाला मंजुरी दिली आहे. हा अभ्यास वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजद्वारे केला जाईल.

केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटनेने (सीडीएससीओ) २९ जुलैला वैद्यकीय चाचणीची शिफारस केली होती. या चाचणीत ३०० निरोगी व्यक्तींना सहभागी करून घेतले जाईल. लसीकरण पूर्ण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसी दिल्या जाऊ शकतात का, याचा अभ्यास यात केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...