आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थामध्ये उदयपूरहून ३० किमी अंतरावरील खोऱ्यात एका मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. पिपलियाजीजवळ डोंगरावर २ किमी भागात दोन मोठे पांढऱ्या रंगाचे डोम बनवले जात आहेत. हे बाहेरून दिसतात. सुरक्षा करणांमुळे आतमधील माहिती डीआरडीओ आणि संरक्षण विभागाद्वारे दिली जात नाही. पुलिया व प्रकल्पाच्या चहुबाजूने मोठमोठ्या भिंती आहेत. बांधकाम एवढे मोठे आहे की, उदयपूर शहरातूनही दिसते. “भास्कर’ने सूत्रांकडून माहिती जमा केल्यावर कळले की, येथे उच्च तंत्रज्ञानयुक्त वेधशाळेचे बांधकाम सुरू आहे. ३ वर्षांपासून काम सुरू आहे. डोम वरून गोलाकार आकारात उघडले जाते. दुर्बिणीने खगोलीय गणना केली जाते.
‘ताऱ्यां’चे शहर 3,500 जणांसाठी कॉलनी... या वेधशाळेपासून जवळपास ८ किमी अंतरावर धार आणि मोरवानिया गावात संरक्षण विभागातील ३५०० लोकांसाठी वसाहत तयार केली जात आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, स्मार्ट गाव तयार होत आहे. त्यात शाळा, हॉस्पिटल, क्रीडांगणासोबत सर्व प्रकारच्या सुविधा असतील. सध्या वसाहतीत जाणे आणि छायाचित्र काढण्यास मनाई आहे. वीज जोडणीसाठी विशेष लाइन टाकली आहे. रात्री वीजेच्या तारा रेडियमसारख्या वाटतात. गावातील लोकांनुसार, येथे लष्करी प्रकल्प सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.