आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
माझा जन्म नंदीग्राममधील नसला तरी शेजारच्या बीरभूम जिल्ह्यातील आहे. मी बाहेरची असल्याचा आराेप काही लाेक करत आहेत. परंतु असा आराेप करणाऱ्यांचा (शुभेंदू अधिकारी) जन्मही नंदीग्राममधील नाही. मग गुजरातमधून आलेल्यांना भूमिपुत्र मानायचे का, असा प्रश्न मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. तृणमूलच्या बूथनिहाय कार्यकर्त्यांशी ममतांनी मंगळवारी संवाद साधला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी त्यांनी अधिकारी यांचा नामाेल्लेख टाळत त्यांना टाेले लगावले. मला लाेकांचा नंदीग्राममधून प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आधी सिंगूरमधून लढावे, असेही वाटले हाेते.
वास्तविक गुजरातमधून आलेल्यांना आत्मा विकलेल्यांनी नंदीग्राममधील जनतेचा अपमान केला आहे. माेठा इतिहास असलेल्या नंदीग्राममध्ये जातीचे कार्ड खेळवले जात आहे. काही लाेक ७०:३० प्रमाण (हिंदू-मुस्लिम समुदाय) यावर बाेलत आहेत. असे बाेलणारे लाेक नंदीग्राम चळवळीतील लाेकांमध्ये भांडण लावण्याचे काम करत आहेत. खरे तर भाजप लाेकांना मूर्ख बनवण्याचे काम करत आहे. अलीकडेच अधिकारी यांनी स्वत: ला भूमिपुत्र संबाेधले हाेते. त्यांच्या वक्तव्याचा ममतांनी आपल्या भाषणातून समाचार घेतला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.