आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Areas With A Population Of 70 Crore Are Not Yet Fully Unlocked, 376 Out Of 734 Districts Still Have Many Restrictions In Place.

दिलासा नाहीच:70 कोटी लोकसंख्येचे क्षेत्र अद्याप पूर्णपणे अनलॉक नाही, 734 जिल्ह्यांपैकी 376 मध्ये अद्याप अनेक निर्बंध आहेत लागू

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • अंशत: लाॅकडाऊन ; 14 राज्यांतील 60 कोटी जनतेला फटका

काेराेना संसर्ग राेखण्यासाठी भारताच्या सुमारे ७० कोटी लोकसंख्येवर आताही लाॅकडाऊनचे पूर्ण किंवा अंशत: निर्बंध लागू आहेत. तथापि, १४ राज्यांत कोणतेही निर्बंध नाहीत. भारतात २ दिवसांपासून ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. आठवडाभरापासून भारतात ब्राझीलपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत.

पूर्ण लाॅकडाऊन| बिहार, मणिपूर येथील १० कोटींवर लोकांना फटका

> बिहार : राज्यात १ ते १६ ऑगस्टपर्यंत लाॅकडाऊन लागू आहे. येथे ७१,७९४ रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोना संसर्ग 4.5% च्या दराने वाढत आहे.

> मणिपूर : सर्व ११ जिल्ह्यांत १५ ऑगस्टपर्यंत लाॅकडाऊन लागू आहे. येथे ३,४६६ रुग्ण आहेत. मणिपूरमध्ये कोरोना संसर्गाचा दर 3.7% इतका आहे.

 • ओडिशा : ३० जिल्ह्यांमध्ये अंशत: लाॅकडाऊन. ४.२ कोटी लोकांना फटका. संसर्ग दर ४.६% आहे.
 • तामिळनाडू : सर्व ३७ जिल्ह्यांत रविवारी लाॅकडाऊन. ७.२१ कोटी लोक प्रभावित. संसर्गाचा दर १.९%.
 • प. बंगाल : सर्व २३ जिल्ह्यांत विविध विभिन्न तारखांना लाॅकडाऊन. एक कोटी लाेकांवर निर्बंध.
 • मध्य प्रदेश : सर्व ५२ जिल्ह्यांत रविवारी लाॅकडाऊन.राेज रात्री कर्फ्यू. ७.२६ कोटी लोकांवर निर्बंध.
 • गुजरात : एका जिल्ह्यातील ६१ लाख लाेकांवर आहेत निर्बंध. राज्यात १.४% दराने संसर्ग वाढत आहे.
 • महाराष्ट्र : १४ जिल्ह्यांतील ३ कोटी लोक लाॅकडाऊनमध्ये. ३१ ऑगस्टपर्यंत निर्बंध. एकूण रुग्ण ५.०३ लाख.
 • राजस्थान : तीन जिल्ह्यांतील १२ लाख लोकांवर आहेत निर्बंध. राज्यात संसर्गाचा दर २.४% इतका आहे.
 • पंजाब : रोज रात्री कर्फ्यू. पावणेतीन कोटी नागरिक प्रभावित. २१ हजार रुग्ण. ४.१% च्या दराने वाढत आहेत.
 • जम्मू-काश्मीर : २० पैकी १० जिल्ह्यांत ऑगस्टअखेरपर्यंत लाॅकडाऊन. ६९ लाख लोकांवर परिणाम.
 • यूपी : वीकेंडला लाॅकडाऊन. २० कोटी लाेकांना फटका. १.१३ लाख रुग्ण, ३.९% च्या वेगाने झाली वाढ.
 • अरुणाचल आणि आसाममध्ये वीकेंडला निर्बंध. नागालँड, मिझोराममध्ये ऑगस्टपर्यंत अंशत: निर्बंध असतील.
बातम्या आणखी आहेत...