आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Argument Over Taking Home A Child From The Quarantine Center, Brutal Murder Of A Child By A Father With A Stick In Balaghat

कोरोनाची भीती:क्वारेंटाइन सेंटरमधून आलेल्या मुलाला घरात घेण्यावरुन वाद, वडिलांकडून दांड्याने मारहाण करत मुलाचा निर्घृण खून

बालाघाट(मध्यप्रदेश)3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडिलांनी मुलाला गावकऱ्यांची परवानगी घेण्यास सांगितले, मुलाने नकार दिला

गडी पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या कुगांव गावात 1 मे राजी क्वारेंटाइन सेंटरमधून परत घरी आलेल्या मुलाला घरात घेण्यावरुन पिता-पुत्राचे जोरदार भांडण झाले. यादरम्यान वडिलांकडून मुलाची दांड्याने मारहाण करत हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी गडी पोलिसांनी आरोपी भीमा पंचतिलकविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुगांव गावाचा रहिवासी टेकचंद पंचतिलक कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाउननंतर औरंगाबादवरुन गडी या आपल्या गावी पोहचला होता. तिथे क्वारेंटाइन सेंटरमध्ये राहिल्यानंतर 1 मे रोजी तो आपल्या गावी गेला. तो आल्याची माहिती वडील भीमा पंचतिलक यांना मिळाल्यावर, त्यांनी मुलगा टेकचंदला घरात येण्यास नकार दिला. 

वडिलांनी त्याला गावकऱ्यांची परवानगी घेण्यास सांगितले, त्यावर दोघांचे जोरदार भांडण झाले. यादरम्यान टेकचंदने वडिलांवर एका दांड्याने हल्ला चढवला, वडिलांनी टेकचंदच्या हातून दांडा घेऊन त्यालाच मारहाण केली. या मारहाणीत टेकचंदचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.